Richest Youtubers India: काय सांगता! भारतातील युट्यूबर आहेत कोट्यधीश, 100 कोटींपेक्षाही जास्त आहे यांची संपत्ती

भारतातील युट्यूबर केवळ यशस्वीच नाहीत तर प्रचंड मोठ्या संपत्तीचे मालक
Entertainment
भारतातील युट्यूबर आहेत कोट्यधीशpudhari
Published on
Updated on

आज कोणत्याही टेलिव्हिजन किंवा ओटीटीपेक्षा युट्यूब व्लॉग आवडीने पाहिले जातात. भारतीय युट्यूब विश्वातही असे अनेक कलाकार आहेत जे फॅन्स त्यांच्या आगामी व्लॉगची आवर्जून वाट पहात असतात. (Latest Entertainment News)

भारतातील युट्यूबर केवळ यशस्वीच नाहीत तर प्रचंड मोठ्या संपत्तीचे मालकही आहेत. टेक इन्फॉर्मरच्या एका यादीनुसार तन्मय भट हे भारतातील सर्वात श्रीमंत युट्यूबर आहे. यशस्वी युट्यूबर आणि लोकप्रिय चॅनल AIB चा संस्थापक म्हणूनही तन्मय भटची ओळख आहे. जाणून घेऊ तन्मयसहित इतर युट्यूबरबाबत जाणून घेऊया.

तन्मय भट : AIB ची स्थापना तन्मयने 2012 मध्ये केली. पण 2019 मध्ये त्याचे विघटन झाल्यानंतर तन्मयने स्वत:चे युट्यूब चॅनेल सुरू केले आहे. जिथे तो व्लॉग, कॉमेडी, रिएक्शन व्हीडियो आणि गेमिंग कंटेंट पोस्ट करत असतो. त्याची अंदाजे संपत्ति 665 कोटी इतकी आहे.

टेक्निकल गुरुजी (गौरव चौधरी) : टेक्निकल समीक्षा आणि नव्या गॅझेटबाबत अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी अनेकजण गौरवच्या युट्यूब चॅनेलला पसंती देतात. गौरव चौधरीची अंदाजे संपत्ती 356 कोटी आहे.

समय रैना : ओपन माइक इव्हेंटसमधून करियरची सुरुवात केलेल्या समयने आज प्रसिद्ध युट्यूबरच्या यादीत नाव मिळवले आहे. याशिवाय उत्कृष्ट बुद्धिबळ खेळाडू आहे. त्याची अंदाजे संपत्ती 140 कोटी आहे.

कॅरी मिनाटी (अजय नागर) : त्याच्या रोस्टींग व्हीडियोमुळे कॅरी चर्चेत आहे. त्याला भारतातील सगळ्यात प्रभावशाली व्यक्तिमत्त्वापैकी एक कॅरी आहे. त्याची अंदाजे संपत्ती 131 कोटी आहे.

भुवन बाम : बी बी की वाईन्ससाठी ओळखला जाणारा भुवन अत्यंत लोकप्रिय युट्यूबर आहे. त्याच्या विनोदी आणि क्रिएटीव्ह कंटेंटमुळे त्याचा एक चाहतावर्ग मोठा आहे. भुवनची एकूण संपत्ती 122 कोटी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news