

पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉलीवूड स्टार टॉम हॉलंड आणि जेंडायाचा साखरपुड्याचे फोटो व्हायरल होत आहेत. ८२ व्या गोल्डन ग्लोब्समध्ये जेंडायाच्या हातात एक मोठी हिऱ्याची अंगठी दिसली होती. त्यानंतर सोशल मीडियावर हे वृत्त व्हायरल होत आहे की, टॉम हॉलंड आणि जेंडायाने साखरपुडा केला आहे.
टॉम - जेंडयाचा साखरपुड्याचा रिपोर्ट ८२ व्या गोल्डन ग्लोब्समध्ये तिच्या हातात अंगठी दिसल्यानंतर काही तासांनी आला आहे. मेगा शोच्या रेड कार्पेट दरम्यान जेव्हा एका पत्रकाराने तिला अंगठी बद्दल विचारले तर तिच्याकडून काही स्पष्ट उत्तर आले नाही. त्यावेळी युफोरिया स्टार थोडीशी लाजलेली दिसली. टॉम हॉलंड - जेंडया २०२१ पासून एकत्र आहेत. त्यांना नेहमी डेटवर वा इवेंटमध्ये एकत्र पाहण्यात आले आहे. २०२३ मध्ये एका मुलाखतीत जेंडयाने यविषयी बातचीत केली होती आणि लोग फोटोज काढतात, ज्यामुळे अनवॉन्टेड अटेंशन मिळतं.
दरम्यान, स्पायडर-मॅन : नो वे होम नंतर जेंडया - टॉम हॉलंड पुढील मार्वल चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. नुकताच ही पुष्टी करण्यात आली होती की, ही जोडी क्रिस्टोफर नोलनचा आगामी चित्रपट, द ओडिसीमध्येही स्क्रीन शेअर करेल. हा चित्रपट २०२६ मध्ये रिलीज होणार आहे.