Tirsaat : ‘तिरसाट’मधून उलगडणार प्रेम मिळवण्याची धडपड

Tirsaat movie
Tirsaat movie

पुढारी ऑनलाईन डेस्क

आयुष्यातली सर्वांत सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम… ते  मिळवण्यासाठी किती धडपड करावी लागते. (Tirsaat) त्यासाठी किती काय काय झेलावं लागतं, याची थरारक गोष्ट तिरसाट या चित्रपटातून उलगडणार आहे. २० मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा टीजर नुकताच लाँच करण्यात आला. (Tirsaat)

दिनेश किरवे यांच्या क्लास वन फिल्म्सनं तिरसाट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अँड. उमेश शेडगे सहनिर्माते आहेत. निर्माता दिनेश किरवे यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे. तर प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांचे दिग्दर्शन आहे. पी. शंकरन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. नीरज सूर्यकांत आणि तेजस्विनी शिर्के ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे.

प्रेम मिळवण्यासाठी सहन करावा लागणारा विरोध, प्रेमासाठी करावी लागणारी धडपड टीजरमधून दाखवण्यात आली आहे. त्यामुळे तिरसाट हा चित्रपट उत्सुकता वाढवत आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातलं उधाण आलंया, फरमान आलंया, जीवाला या जीवाचं आवताण आलंया,' असे शब्द असलेलं गाणं लाँच करण्यात आलं. या गाण्याला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. आता या टीजरमुळे आता चित्रपटाची आणखी चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा: 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news