तिकळी मालिका | वेद-नलीला एकमेकांपासून दूर करण्याचा बाबारावचा मोठा प्लॅन

Tikali Marathi Serial | लग्नसोहळ्यात बाबारावचा नली-वेदला तोडण्यासाठी मोठं कारस्थान
Tikali Marathi Serial
तिकळी मालिकेत काय घडतय? Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - प्रेक्षकांना मोहित करणाऱ्या 'तिकळी' या मालिकेत आता एक रोमांचक वळण येणार आहे. वेद आणि नलीच्या प्रेमाची परीक्षा बाबारावच्या धूर्त योजनेमुळे होणार आहे. बाबाराव, ज्याची भूमिका अभिनेते दिगंबर नाईक साकारत आहेत. प्रोमोमध्ये पहिल्याप्रमाणे बाबाराव नलीकडून वचन घेतो की तिच्या भावाचं आणि मितालीचं लग्न लावून देईन पण त्यासाठी नलीने वेदपासून दूर जायचं. वेदवर तिचं प्रेम नाही हे सांगून ती वेदचं मन मोडते पण ह्या सगळ्या मागे बाबारावचा काय प्लॅन आहे ह्याबद्दल नलीला जराही कल्पना नाही.

बाबारावने ठरवल्याप्रमाणे ऋषीला लग्नातून गायब करून बाबाराव स्वतःच्या मुलाला, वेदला, मितालीसोबत लग्नासाठी तयार करतो. सगळं नियोजन जुळवून बाबारावची योजना यशस्वी होणार का? नली लग्नमंडपात पोहोचू शकेल का? वेद आणि नली ह्या कारस्थानामुळे दूर जातील का? वेद आणि नलीचं काय असेल भविष्य? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. त्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या लग्न सोहळ्यात पाहायला मिळणार आहे.

‘तिकळी’ लग्नसोहळा विशेष भाग ७ ऑक्टोबर रात्री १०:०० वाजता सन मराठीवर पाहता येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news