

Ott series Releasing on this weekend
वीकएंडला ott मूड साठी काही तरी खास शोधत आहात का? थांबा या दोन दिवसातील काही ott रिलीज तुमचा वीकएंड अधिकच मनोरंजक बनवतील. कारण या शुक्रवारी रिलीज होत आहेत क्राइम, स्पोर्ट्स स्टोरी, सायकोलॉजिकल थ्रीलर किंवा मनोरंजक कोर्टरूम ड्रामा यापैकी कोणताही जॉनर तुम्ही या वीकएंडला एंजॉय करू शकता.
netflix आणि Apple TV + वर रिलीज होणाऱ्या या सिरिजमधून तुम्ही तुमची आवडती सिरिज निवडू शकता. पाहुयात कोणत्या सिरिज आणत आहेत मनोरंजनाची मेजवानी.
व्यंकटेश दग्गुबाती यांच्या अभिनयाने सजलेला राणा नायडूचा सीझन 2 प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी सज्ज झाला आहे. गुन्हेजगत आणि गुंतागुंतीचे कौटुंबिक संबंध यातील अनेक ट्विस्ट आता सीझन 2 मध्ये पाहायला मिळतील यात शंका नाही. ही सिरिज Netflix वर पाहता येईल.
कोर्टरूममधील intence ड्रामा आणि उत्तम अभिनयाचा तडका असलेला हा सिनेमा आता ott वर आला आहे. अक्षय कुमार, आर माधवन आणि अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा आहे. जालियनवाला बाग हत्याकांड आणि त्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी लढलेल्या कायदेशीर लढाईवर हा सिनेमा बेतला आहे. हा सिनेमा तुम्हाला Jio Hotstar वर पाहता येईल.
हरवलेल्या मुलाला शोधण्यासाठीची आईची धडपड, प्रवास आणि त्याअनुषंगाने येणारे ट्विस्ट अँड टर्न्स या सिरीजला अधिक रंजक बनवतात. या शोधमोहिमेदरम्यान निर्माण होणारे ताण तणाव, सस्पेन्स यामुळे अधिक आकर्षकरित्या समोर येते. Apple TV+ वर ही सिरिज पाहता येणे शक्य आहे.
मित्रांच्या गटाची ही गोष्ट आहे जे क्रीडा कोट्यातून कॉलेजप्रवेशाची तयारी करत असतात. यासाठी ते बॉक्सिंग या खेळाची मदत घेत असतात. हा प्रवास एका सुंदर बॉंडिंगमध्ये बदलत जातो. या मित्रांना कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो का त्यासाठी त्यांना कोणत्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो हे पाहण्यासाठी ही प्रेरणादायी सिरिज जरूर पाहा Sony Liv वर
ही टेलिव्हिजन ड्रामा सिरिज आहे. एका ग्लोबल ट्रेन प्रवासादरण्यान हे कथानक आकार घेत. मानवी भावना आणि संबंध यावर ही सिरिज आहे. अमेझोन प्राइम व्हीडियोवर ही सिरिज तुम्ही पाहू शकता.
या कोर्टरूम ड्रामामध्ये भ्रष्ट्राचार आणि अन्यायाच्या खटल्यांची हाताळणी करणाऱ्या एका वकिलाची ही गोष्ट आहे. यावेळी कोर्टरूम कारवाई, सस्पेन्स आणि मालिकेतील वळणे तिला रंजक बनवतात. हा ड्रामा तुम्ही लायन्सगेट प्लेवर पाहू शकता.
क्राइम थ्रीलर जॉनरची ही सिरिज साऊथ आफ्रिकन गुन्हेगारी जगतावर बेतलेली आहे. गुन्हेगारी जगतावर वर्चस्व मिळवण्यासाठी केलेला रक्तरंजीत संघर्ष या सिरिजमध्ये दिसतो आहे. ही सिरिज Netflix वर पाहता येईल.