भारतीयांचे सिनेमाप्रेम जगप्रसिद्ध आहे. वर्षभरात बॉलीवूडमध्ये हजारोच्या घरात सिनेमे प्रदर्शित होत असतात. त्यापैकी काही खास सिनेमे मात्र सार्वकालिक हीट असतात. असेच सुपरहिट असलेले काही सिनेमे 30 ऑगस्टला पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहेत. सध्या स्त्री 2 आणि खेल खेल मे या नव्या सिनेमांच्या भाउगर्दीत हे सिनेमे परत भाव खाऊन जातील यात शंका नाही.
निर्माता सोहम शाहचा अभिनय असलेल्या या सिनेमाने अनेक विक्रम मोडीत काढले. उत्तम स्क्रीनप्ले आणि ध्वनि संयोजन यांचा मिलाफ असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. हा सिनेमा आता 30 ऑगस्टला रि रिलीजसाठी तयार आहे.
अनुराग कश्यपच्या या सिनेमाचा खास असा चाहतावर्ग आहे. गँगस्टर ड्रामा अशा काहीशा प्रकारात मोडणारा हा सिनेमाही यावेळी रिलीज होतो आहे.
टेलिव्हिजन रिलीजनंतर सगळ्यात जास्त प्रसिद्धी मिळालेला सिनेमा म्हणजे रहना है तेरे दिल मे. आर. माधवन आणि दिया मिर्झा या त्यावेळच्या सुपरफ्रेश जोडीचा हा सिनेमा सुश्राव्य संगीतामुळेही लक्षात राहतो.
अॅनिमल फेम तृप्ती डीमरीची सालस भूमिका असलेला हा सिनेमा अलीकडेच रिलीज झाला होता.
ए आर रहमान यांचे संगीत असलेला हा सिनेमा रणबीर सिंग आणि नर्गिस फाखरी यांची भूमिका असलेला हा सिनेमाही यासोबत रिलीज होतो आहे.
गोविंदा आणि शक्ति कपूर यांच्या धमाल अदाकारीने सजलेला हा सिनेमा पुनः प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज आहे.
कुस्तीगीर मुली आणि त्यांच्या वडिलांची जिद्दीची गोष्ट या सिनेमात आहे.
जवळपास 30 वर्षानी हा कौटुंबिक सिनेमा पुनः एकदा रिलीजसाठी सज्ज आहे.