पुढारी ऑनलाईन डेस्क - मराठमोळा वैभव कुलकर्णी दिग्दर्शित ‘द रॅबिट हाऊस’ या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने आतापर्यंत २१ आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. चित्रपटाच्या कथेसोबतच त्याचे अप्रतिम व्हिज्युअल आणि संगीत याचीही चर्चा होत आहे.
हिमाचल प्रदेशच्या ग्रामीण भागात सेट केलेले, 'द रॅबिट हाऊस' २० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. कृष्णा पांढरे यांची निर्मिती आहे. निर्मात्या सुनीता पांढरे यांचेही चित्रपटाच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान आहे. चित्रपटात पद्मनाभ गायकवाड, अमित रिया आणि करिश्मा प्रमुख भूमिकेत आहेत.
दिग्दर्शक वैभव कुलकर्णी म्हणाले, "द रॅबिट हाऊस ही एक कथा आहे जी सांगण्याची गरज आहे, आणि मला खूप आनंद झाला आहे की या चित्रपटाला रिलीज होण्यापूर्वीच प्रेक्षकांकडून इतका सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ही संस्कृती, एक आहे. भावना आणि गूढ यांचे मिश्रण आहे आणि प्रेक्षकांना ते थिएटरमध्ये अनुभवण्याची मी प्रतीक्षा करू शकत नाही."