'IC 814: The Kandahar Hijack' वर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मागे

'आयसी८१४ : द कंदहार हायजॅक' बंदीवरील याचिका मागे घेतली
 IC 814: The Kandahar Hijack
Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - Netflix ची सीरीज 'IC 814: The Kandahar Hijack' वर बंदी घालण्याचे निर्देश मागणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयातून मागे घेण्यात आली आहे. वकिलामार्फत याचिकाकर्त्याने असे म्हटले आहे की नेटफ्लिक्सद्वारा अपहरणात सामील असलेल्या दहशतवाद्यांची खरी नावे स्पष्ट करणारे डिस्क्लेमर जोडले आहे. ते जनहित याचिकामध्ये उपस्थित केलेल्या चिंतांचे निराकरण करते.

'आयसी८१४ : द कंदहार हायजॅक'- काय आहे वाद?

'आयसी८१४ : द कंदहार हायजॅक' या वेबसीरीजवरून केंद्र सरकारनं फटकारलं होतं. त्यानंतर 'नेटफ्लिक्स इंडिया'नेवेब सीरिजमध्ये विमान अपहरणकर्त्यांच्या खऱ्या नावांचा वापर करण्यात येणार असल्याचं सांगितलं. वेब सीरीजमध्ये अपहरणकर्त्यांची ओळख लपवण्यासाठी त्यांना हिंदू सांकेतिक नावं देण्यात आली होती. यावरून सोशल मीडियावरदेखील दिवसभर ट्रेंड राहिलेला दिसून आला. हे चित्रण चुकीचं असल्याचं आक्षेप काहींनी घेतला. वास्तविक, या अपहरणकर्त्यांची खरी नावे इब्राहिम अख्तर, शाहीद अख्तर सय्यद, सन्नी, अहमद काझी, झहूर मिस्त्री आणि शकीर अशी होती.

‘आयसी-८१४ - द कंदाहार हायजॅक’ या सीरिजमधील अपहरणकर्त्यांना हिंदू नावे दिल्यामुळे वाद निर्माण झाला होता. सरकारने नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कंटेंट प्रमुखाला समन्स बजावलं होतं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं स्पष्टीकरण मागितल्यानंतर 'वेब सीरिजमध्ये वास्तव चित्रण होईल, याची खबरदारी घेण्यात येईल. अपहरणर्त्यांची खरी आणि सांकेतिक नावं सुरुवातीलाच दाखवण्यात येतील,' असे कंटेंट प्रमुखाने सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news