The Legend of Maula Jatt | १० वर्षानंतर पाकिस्तानी चित्रपट भारतात होणार रिलीज

१० वर्षानंतर पाकिस्तानी चित्रपट भारतात होणार रिलीज
The Legend of Maula Jatt
१० वर्षानंतर पाकिस्तानी चित्रपट भारतात रिलीज होणार आहेInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि माहिरा खान स्टारर द लीजेंड ऑफ मौला जट्ट १० वर्षांनंतर रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट भारतातील सिनेमागृहात रिलीज होणार आहे. हा ओरिजीनल चित्रपट २०२२ मध्ये रिलीज झाला होता. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि अभिनेत्री माहिरा खान यांचे फॅन फॉलोईंग असणारा एक वेग‍ळा वर्ग आहे.

कधी भारतात रिलीज होणार 'द लीजेंड ऑफ मौला जट्ट'

दिग्दर्शक बिलाल लशारीने भारतात द लीजेंड ऑफ मौला जट्टची रिलीज अनाउंसमेंट करत एक पोस्ट शेअर केली. यामध्ये लिहिलं होतं, “भारताच्या पंजाबमध्ये बुधवारी, २ ऑक्टोबरला द लीजेंड ऑफ मौला जट्ट रिलीज होत आहे. दोन वर्षे झाले, पण पाकिस्तानात अद्यापही थिएटर्स वीकेंडवर हाऊसफुल्ल आहे! आता मी भारतात आपल्या पंजाबी प्रेक्षकांना प्रेमाच्या या जादूचा अनुभव करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.”

माहिरा खान काय म्हणाली?

माहिरा खानने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. तिने आपली उत्सुकता शेअर करत लिहिले, “चला जाऊया.” फवादने री-पोस्ट करत लिहिलं, द लीजेंड ऑफ मौला जट्ट एक दशकाहून अधिक वेळेत भारतीय सिनेमागृहात रिलीज होणारा पहिला पाकिस्तानी चित्रपट ठरेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news