

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोना महामारी नैसर्गिक नसून ती मानव निर्मित असल्याचा दावा लेखक, दिग्दर्शक सुवदन आंग्रे यांनी विविध पुराव्यांच्या आधारे केला आहे. (The Dogs Separation Movie) याच धर्तीवर आंग्रे यांनी 'द डॉग्ज सेपरेशन" हा सत्य घटनेवर आधारीत सस्पेन्स थ्रीलर हिंदी चित्रपट तयार केला असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (The Dogs Separation Movie)
'डीप सी मुव्हीज'ची निर्मिती असलेल्या 'दी डॉग्ज सेपरेशन'या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शक सुवदन आंग्रे यांनी केले आहे. याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, कोरोना महामारीने संपूर्ण जागावर व परिणामी नागरिकांवर खोलवर परिणाम केले आहेत. कोरोना नंतर जसे चांगले बदल झाले तसेच काही वाईट परिणाम देखील झाले. घटस्फोट घेण्याकडे, एकटे राहण्याकडे तसेच विना आपत्य वैवाहिक आयुष्य जगण्याकडे लोकांचा कल वाढला आहे; असे जागतिक आकडेवारी वरून सिद्ध आले आहे. अन् याच मुद्द्यावर 'दी डॉग्ज सेपरेशन' हा चित्रपट भाष्य करतो.
हा चित्रपट हिंदी भाषेत तयार करण्यात आला असून याला इंग्लिश सबटायटल असणार आहेत. तसेच यामध्ये अभिनेता आदित्य अलंकार, लीना नंदी, मिथिला नाईक, त्रिशन कुमार, केतन महाजन, नूपुर पंडित, निखिल घमरे, शुभम साखरे, तनिष्क खन्ना, दीपक जोशी, सुवदन आंग्रे, रोहन लोलगे, अभिर आणि आयुष चिंचाळकर आणि जिमी-द डॉग आदी कलाकारांनी काम केले आहे. संगीत संगीतकार युग भुसाळ यांचे असून निर्मात्या दीपाली आंग्रे आहेत.