ठरलं तर मग मालिकेत सर्वात मोठं वळण, सायली अर्जुनसमोर व्यक्त करणार तिच्या मनातलं प्रेम

Tharala Tar Mag | ठरलं तर मग मालिकेत सर्वात मोठं वळण, सायली अर्जुनसमोर व्यक्त करणार तिच्या मनातलं प्रेम
Tharala Tar Mag
ठरलं तर मग मालिकेत सर्वात मोठं वळण येणार Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - स्टार प्रवाहची ठरलं तर मग मालिका सध्या अतिशय रोमांचक वळणावर येऊन पोहोचली आहे. अर्जुनने सर्वांदेखत सायलीवरच्या प्रेमाची कबुली दिलीय. मात्र मधुभाऊंना दिलेल्या वचनाखातर सायली आपल्या मनातील भावना व्यक्त करु शकली नाही. सायली अर्जुनसमोर तिच्या मनातलं प्रेम व्यक्त करणार आहे. मालिकेतलं हे सर्वात मोठं वळण आहे.

कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य उघड झाल्यानंतर सुभेदार कुटुंबाने आपली तीव्र नाराजी व्यक्त करुन सायलीला घराबाहेर काढलं. अर्जुनलाही अद्याप त्याच्या कुटुंबियांनी माफ केलेलं नाही. तिकडे मधुभाऊंच्या मनातही अर्जुनविषयी बरेच गैरसमज आहेत. अश्या परिस्थितीत अर्जुन-सायली कसे एकत्र येणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ठरलं तर मग रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाहवर पाहता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news