

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकप्रिय तेलगू अभिनेत्री गायत्री उफ्र डॉली डिक्रूझचे (Telugu actor Dolly DCruz) एका भीषण कार अपघातात निधन झाले. सुत्रांच्या माहितीनुसार, गायत्री तिच्या मैत्रिणीसोबत कारने जात होती. या अपघातात त्याच्या मित्राचाही मृत्यू झाला. ही घटना हैद्राबादच्या गचीबोवली भागात घडली आहे. गायत्रीच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला असून तिचे चाहते खूप दुःखी आहेत.
कार डिव्हायडरला धडकल्याने झाला अपघात (Telugu actor Dolly DCruz)
गायत्रीची मैत्रिण गाडी चालवत होती, मात्र त्यानंतर मैत्रिणीचा कारवरील ताबा सुटला आणि कार डिव्हायडरला धडकली. २६ वर्षांच्या गायत्रीला जागीच मृत घोषित करण्यात आले. तर तिचा मित्र राठोड याचा रुग्णालयात मृत्यू झाला. यादरम्यान कारने एका प्रवासी महिलेलाही धडक दिली त्यामध्ये त्या महिलेचा देखिल मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सुरेखा वाणी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली माहिती (Telugu actor Dolly DCruz)
गायत्रीच्या मृत्यूची बातमी अभिनेत्री सुरेखा वाणी यांनी दिली. सुरेखा वाणी यांनी एका मालिकेत गायत्रीच्या आईची भूमिका केली आहे. या अत्यंत वेदनादायी प्रसंगी अभिनेत्री सुरेखा यांनी सोशल मीडियावर लिहिले, "तू या आईला कसे सोडून जाऊ शकतेस. तुझ्या सोबत खूप चांगला वेळ घालवला. तरीही माझा विश्वास बसत नाही..! तु लवकरच परत येशील का? बरं, आपण एक छान पार्टी करू. खूप काही शेअर करण्यासारखे आहे..! एकत्र करण्यासारखे खूप काही आहे. सर्वांना सोडून जायची ही वेळ नाही. लव्ह यू "
'मॅडम सर मॅडम अंते' मधून अभिनेत्रीला मिळाली लोकप्रियता
गायत्रीला 'मॅडम सर मॅडम अंते' या तेलगू वेब सीरिजने लोकप्रियता मिळाली. यासोबतच तिने जलसा रायडू या तिच्या यूट्यूब चॅनलद्वारेही खूप लोकप्रियता मिळवली. याशिवाय गायत्रीने अनेक शॉर्ट फिल्म्समध्ये काम केले आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय होती आणि तिची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे.