Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडित दाक्षिणात्य चित्रपट 'अहो विक्रमार्का'मध्ये

तेजस्विनी पंडित दाक्षिणात्य चित्रपट 'अहो विक्रमार्का' मध्ये
Tejaswini Pandit
तेजस्विनी पंडित दाक्षिणात्य चित्रपट 'अहो विक्रमार्का' मध्ये Tejaswini Pandit
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री तेजस्विनी पंडित ( Tejaswini Pandit ) हिने आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्या अभिनयाचे सशक्त पैलू उलगडून दाखविले आहेत, प्रत्येक भूमिकेत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारी ही अभिनेत्री आता ‘अहो विक्रमार्का’ या दाक्षिणात्य अॅक्शनपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात वीरांगणा 'भवानी' ही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा ती साकारत आहे.

दिग्दर्शक राजामौली यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या त्रिकोटी पेटा यांच्या आगामी ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटात अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत. देव गिल प्रॉडक्शन अंतर्गत ‘अहो विक्रमार्का’ मराठी व्यतिरिक्त इतर ५ भाषांमध्ये मोठ्या पडद्यावर ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

या भूमिकेबद्दल तेजस्विनीने सांगितले आहे की, ‘कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये काम करताना कलाकारांसाठी त्यातील आव्हान आनंददायी असतात. ‘अहो विक्रमार्का' चित्रपटात सगळ्यात मोठं भाषेचे आव्हान होते. कारण, केवळ भाषा नव्हे तर त्याचं व्याकरण सुद्धा समजून घ्यावं लागतं. साऊथचे सगळे कलाकारांचा साधेपणा मला खूप भावला. आजवर माझ्या वेगवेगळ्या भूमिकांना प्रेक्षकांनी मला चांगला प्रतिसाद दिला असून ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटातील माझ्या भूमिकेचं प्रेक्षक कौतुक करतील.'

हा दाक्षिणात्य चित्रपट असला तरी तो मराठीत देखील प्रदर्शित होणार आहे. आता दाक्षिणात्य आणि मराठी कलाकार चित्रपटात काय कमाल करतात? हे पहाणे औत्सुक्याचं ठरणार आहे. 'अहो विक्रमार्का’ चित्रपटसृष्टीतील पहिला ब्लॉकबस्टर-पॅन इंडिया चित्रपट ६ भाषांमध्ये ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

अभूतपूर्व साहस, जाज्वल्य देशाभिमान चित्रपटात दाखवला आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता देव गिल या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. धडाकेबाज अॅक्शनसीन, नायक नायिका यांच्यातील फुलणारं प्रेम आणि कुटुंबामधील प्रभावी नाट्य अशा त्रिसूत्रीवर आधारलेला रोमँटिक आणि अॅक्शनचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला ‘अहो विक्रमार्का’ हा मल्टीस्टारर चित्रपट प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन करणार आहे.

आरती देविंदर गिल, मिहिर कुलकर्णी आणि अश्विनी कुमार मिश्रा निर्मित या चित्रपटाची कथा पेनमेत्सा प्रसाद वर्मा यांची आहे. तर संगीत रवी बसरूर आणि आर्को प्रावो मुखर्जी यांनी दिले आहे, छायांकन करम चावला आणि गुरु प्रसाद एन यांनी केले आहे आणि संकलन तम्मीराजू यांनी केले आहे.‘अहो विक्रमार्का' हा पहिला मराठी चित्रपट आहे, जो एकाच वेळी मराठी आणि तेलगू या दोन भाषेत पाहायला मिळणार आहे.

समांतर २ : तेजस्विनी पंडित आणि स्वप्निल जोशीचे बोल्ड सीन्स 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news