

Tarak Mehta Sodhi Gurucharan Singh new video
मुंबई - टीव्ही अभिनेता गुरुचरण सिंह पुन्हा परत व्हिडिओ द्वारे भेटायला आल्यानंतर 'तारक मेहता'च्या फॅन्सना आनंद झालाय. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते म्हणाताहेत...बाबा जीने त्यांचे आणि त्यांच्या परिवाराची विनंती ऐकली आणि लवकरच ते आपल्या फॅन्सना एक आनंदाची वार्ता ऐकवणार आहेत.
तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये सोढीची भूमिका गुरुचरण सिंह यांनी साकारली आहे. पण मागील काही काळापासून ते अभिनय करताना दिसत नव्हते. २०२० मध्ये अखेरीस ते दिसले होते. गुरुचरण यांच्या जीवनामध्ये मोठ्या समस्या आल्या. ते कुठेतरी निघून गेले होते. परंतु, काही दिवसांनंतर ते परतले आणि कुटुंबीयांना सांगितले की, ते गुरुद्वारामध्ये राहत होते.
गुरुचरण यांनी त्यांना आलेल्या समस्याबद्दल खुल्यापणाने सांगितले. त्यांनी सांगितलं होतं की, त्यांच्याजवळ काम नाही आणि उधार देखील फेडायचं आहे.
त्यांचा नवा व्हिडिओ समोर येताच आता लोकांनी हा कयास लावणे सुरु केलं आहे की, कदाचित गुरुचरण टीव्ही मालिका 'तारक मेहता का उल्टी चश्मा'मध्ये वापसी करतील.
गुरुचरण यांनी इन्स्टाग्रामवर आपला व्हिडिओ शेअर करून म्हटले की, 'आज मी खूप दिवसांनंतर सर्वांसमोर आलो आहे. कारण, फायनली परमेश्वराने माझी आणि माझ्या परिवाराची आणि फॅन्सची प्रार्थना ऐकलीय. आज सर्वांचे आभार. काही गुड न्यूज आहे, जी माझ्यासाठी खूप मोठी आहे. आपल्या सर्वांसोबत लवकरच गुड न्यूज शेअर करेन. मी आपल्या सर्वांचा आभारी आहे, कारण, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली.'
रिपोर्टनुसार, गुरुचरण सिंह आता बिग बॉस १९ मध्ये सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे.