Mango Vanilla Cake : चेन्नईत मँगो व्हेनिला केकच्या मागणीत अचानक वाढ, मुख्यमंत्री विजय-त्रिशाशी काय संबंध?

चेन्नईत मँगो व्हॅनिला केक का ठरला सुपरहिट? जाणून घ्या मुख्यमंत्री विजय आणि त्रिशाशी काय आहे कनेक्शन..
Mango Vanilla Cake
Mango Vanilla Cake : चेन्नईत मँगो व्हेनिला केकच्या मागणीत अचानक वाढ, मुख्यमंत्री विजय-त्रिशाशी काय संबंध?file photo
Published on
Updated on

tamil nadu cm vijay thalapathy birthday cake popular in chennai and demand has increased

पुढारी ऑनलाईन : CM Vijay Thalapathy Birthday Cake Popular In Chennai: २२ जून रोजी अभिनेता आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी अभिनेत्री तृषासोबत आपला ५२ वा वाढदिवस साजरा केला होता. या सेलिब्रेशनमधील मँगो केकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि आता चेन्नईत या केकची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे.

Mango Vanilla Cake
Thalapathy Vijay Jana Nayagan release date|'जन नायकन' कधी प्रदर्शित होणार? विजय यांच्या बहुचर्चित चित्रपटाबाबत मोठे अपडेट

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि लोकप्रिय अभिनेते विजय यांच्याविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी जवळची मैत्रीण तृषासोबत वाढदिवस साजरा केला. त्या वेळी वाढदिवसाच्या फोटोंमध्ये दिसलेला मँगो व्हॅनिला केक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला असून, चेन्नईत या केकची मागणी झपाट्याने वाढली आहे.

मँगो केक आता 'सीएम केक' म्हणून प्रसिद्ध

चेन्नईतील बेकर तन्वी बोकारिया यांनी सांगितले की, २२ जून रोजी तृषाने विजय यांच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्यांच्या बेकरीत तयार केलेल्या मँगो व्हॅनिला केकची मागणी अचानक वाढली. गेल्या दोन आठवड्यांत त्यांनी ४०० हून अधिक मँगो व्हॅनिला केक विकले आहेत. विशेष म्हणजे, ग्राहक आता हा केक ऑर्डर करताना "सीएम केक" द्या, अशीच मागणी करत आहेत.

Mango Vanilla Cake
Trisha Krishnan| त्रिशाच्या पोस्टने सर्वांची बोलती बंद; वाढदिवशी शुभेच्छा नाहीत म्हणून चर्चा, पण दुसऱ्याच दिवशी दिलं मोठं सरप्राईज

तृषाने खास पद्धतीने साजरा केला विजय यांचा वाढदिवस

माध्यमांतील वृत्तांनुसार, विजय आणि तृषा कृष्णन यांची चांगली मैत्री आहे. त्यांच्या नात्याबाबत अनेकदा चर्चा रंगल्या असल्या तरी दोघांनीही याबाबत कधीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र दिसले आहेत. अलीकडेच विजय यांच्या शपथविधी सोहळ्यातही तृषा उपस्थित होती. त्या वेळी ती भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले.

'जन नायकन' ठरणार विजय यांचा शेवटचा चित्रपट

गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेला विजय यांचा 'जन नायकन' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा विजय यांच्या अभिनय कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर ते तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून पूर्णवेळ सार्वजनिक आणि राजकीय कामकाजावर लक्ष केंद्रित करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news