ओडेला २ नंतर तमन्ना भाटिया नीरज पांडेच्या नव्या चित्रपटात दिसणार?

तमन्ना भाटिया
तमन्ना भाटिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्याकडे यावर्षी प्रोजेक्ट्सची लाईन लागली आहे. अलीकडेच तिने तिच्या आगामी 'ओडेला 2' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आणि आता तमन्नाला दिग्दर्शक नीरज पांडेच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये मुख्य भूमिकेसाठी विचारण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहेत. याबद्दल अधिक माहिती आली नसून नक्की तमन्ना नीरजच्या चित्रपटात दिसणार का? हे पाहणं उत्कंठावर्धक ठरणार आहे.

तमन्ना भाटिया स्टारर अनटायटल प्रोजेक्ट OTT वर रिलीज होणार आहे, असे म्हटले जात आहे. सूत्रांनुसार चित्रपटाचे शूटिंग २४ फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे. चित्रपटाच्या तारखेबाबत अद्याप माहिती नाही. निर्मात्यांनी हा अनटायटल प्रोजेक्ट यावर्षी रिलीज होणार असल्याचं सांगितलं. '

ओडेला २' व्यतिरिक्त तमन्ना भाटिया जॉन अब्राहमसोबत " वेदा " मध्येही दिसणार असून तमिळ चित्रपट 'अरनमानई ४' मध्येही ती दिसणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news