Tamannaah Bhatia | तमन्ना भाटियाची ED चौकशी, काय आहे वाद?

Money Laundering Case | तमन्ना भाटियाची ED चौकशी,
Money Laundering Case
तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलीवुड अभिनेत्री तमन्ना भाटियाची ED चौकशी झाली. पुन्हा एकदा महादेव बेटिंग ॲपच्या वादामुळे ती चर्चेत आली. तिच्यावर आरोप आहे की, तिने आयपीएल सामन्यांच्या अवैध स्ट्रीमिंगला प्रोत्साहन दिलं. या गुरुवारी तमन्ना भाटिया गुवाहाटीमध्ये परिवर्तन निदेशालय (ED) समोर सादर झाले. तिच्यावर आरोप आहे की, तिने भारतीय प्रीमियर लीग सामन्यांच्या अवैध स्ट्रीमिंगला प्रोत्साहन दिलं आहे, जे महादेव ऑनलाईन जुगार आणि बेटिंग प्लॅटफार्मसाठी सहाय्यक ॲप्लीकेशनवर केलं जात होतं. ED महादेव बेटिंग ॲपचे सहाय्यक ॲप Fair Play वर आयपीएल सामन्यांना प्रमोट केल्याप्रकरणात तमन्नाची चौकशी करत आहे. या ॲपच्या माध्यमातून आयपीएलच्या सामन्यांचे अवैध प्रसारण केलं गेलं होतं, ज्यामुळे Viacom ला एक कोटींचे नुकसान झाले.

HPZ ॲप प्रमोशनचा तपास

ED द्वारा तमन्ना भाटियाशी HPZ ॲपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. कारण या ॲपला तमन्नाने प्रमोट केलं होतं. हे ॲप महादेव बेटिंगशी संबंधित आहे.

मागील वर्षी रणबीर-श्रद्धा कपूरची झाली होती चौकशी

मागील वर्षी महादेव बेटिंग ॲप चर्चेत आलं होतं. जेव्हा ED ने रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरला चौकशीसाठी बोलावलं होतं. हे दोघे त्या ॲपच्या जाहिरातींमध्ये दिसले होते. बेटिंग एक्सचेंज प्लॅटफार्म Fairly Play अनेक खेळ आणि मनोरंजनचे विकल्प देतो. हे महादेव ऑनलाईन जुगार ॲपचा एक हिस्सा आहे, जे कार्ड गेम, चान्स गेम, क्रिकेट, पोकर, बॅडमिंटन, टेनिस आणि फुटबॉल सारख्या लाईव्ह खेळांवर अवैध बेटिंगची सुविधा देतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news