तमन्ना भाटिया-राशी खन्नाचा ‘अरनमनाई ४’ हिंदीतही डब होणार

तमन्ना भाटिया
तमन्ना भाटिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही दिवसांपासून 'अरनमनाई ४' या तमिळ चित्रपटाने दक्षिणेकडे बॅाक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत रसिकांवर मोहिनी घातली आहे. ३ मे रोजी प्रीमियर झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. 'अरनमनाई ४' जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हा चित्रपट हिंदीतही डब करण्यात आला आहे. २४ मे रोजी 'अरनमनाई ४' हिंदीमध्येही रिलीज होणार आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांना थरारक अनुभव देत मंत्रमुग्ध केले आहे. आता हा चित्रपट हिंदी भाषिक प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचण्यास सज्ज झाला आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?

'अरनमनाई ४' मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या सुंदर सी. यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. खुशबू सुंदर आणि एसीएस अरुण कुमार यांच्यासह साजिद कुरैशी आणि सुशील लवानी यांनी यशस्वीपणे चित्रपट निर्मितीची धुरा सांभाळली आहे. बाक नावाच्या भयानक भूताच्या विश्वात नेणारा 'अरनमनाई ४' पूर्व भारतीय लोककथांच्या सफरीवर नेणारा आहे. तमिळनाडूच्या कोवूरमधील रहस्यमय पार्श्वभूमीवर आधारलेला हा चित्रपट कुटुंबातील चांगल्या आणि वाईट शक्तींमधील संघर्षाचे चित्रणही करतो.

हे कलाकार मुख्य भूमिकेत

तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना या दोन तगड्या अभिनेत्री यात मुख्य भूमिकेत आहेत. दहा दिवसात ६६ कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय 'अरनमनाई ४' ने केले आहे.

हेदेखील वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news