

मालिकांच्या जगात आता अॅक्शनपॅक्ड अध्याय सुरू होणार आहे. याला कारण आहे नवीन मालिका तारिणी. शिवानी सोनार या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसते आहे. या मालिकेचा हटके प्रोमो नुकताच समोर आला आहे. शिवानी शिवाय या मालिकेत अभिज्ञा भावे दिसते आहे. याशिवाय एन स्वराज नावाचा अभिनेताही शिवानी सोनारसोबत या मालिकेत दिसणार आहे.
तारिणीचा प्रोमो सोशल मिडियावर तूफान व्हायरल होतो. शिवानीला अशा डॅशिंग अवतारात बघून तिचे चाहते खुश झाले आहेत.
मालिका हटके संकल्पना घेऊन समोर आली आहे. घर आणि करियर याचा सुंदर संगम साधणारी तारिणी यात दिसते. तारिणी ही व्यक्तीरेखा स्पेशल क्राइम युनिट ऑफिसरची आहे. मालिका कधी सुरू होणार आणि वेळ काय असणार हे अजून समोर आलेले नाही.
या मालिकेचा प्रोमो रिलीज झाल्यानंतर कोणती मालिका निरोप घेणार याची चर्चा चाहत्यांनी सुरू केली आहे. काहीजणांनी लाखात एक आमचा दादा ही सिरियल निरोप घेईल असे लिहिले आहे तर काहीनी शिवा या मालिकेची वेळ बदलून तारिणी ही मालिका सुरू करतील असे लिहिले आहे.
या मालिकेत शिवानीसोबत दिसणारा चेहरा म्हणजे अभिनेता स्वराज नागरगोजे. स्वराज यापूर्वी अनेक मालिकांमध्ये सहकलाकाराच्या भूमिकेत दिसला आहे. सजनी शिंदे का व्हायरल व्हीडियो या सिनेमात तसेच तुझी माझी जमली जोडी या मराठी मालिकेतही काम केले आहे.
व्हीडियो व्हायरल होताच शिवानीच्या फॅन्स तसेच सहकालाकरांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. पूर्वा राजेंद्र शिंदे म्हणते, खूप छान, शुभेच्छा आणि अभिनंदन. तर सुमित पुसावळेने कडक ! अशी कमेंट करत शिवानीचे कौतुक केले आहे.