Bollywood : शाहरूखबाबत असं बोलायची तुम्ही हिम्मतही करू शकत नाही..“वयाचा भेदभाव फक्त अभिनेत्रींसोबतच”

चित्रपटसृष्टीतील दुटप्पीपणाबद्दल तापसी पन्नूचे भाष्य : “वय वाढलं की रोल कमी होतात”; तापसी पन्नूने मांडली इंडस्ट्रीतील कटू वास्तवता
Bollywood
Bollywood : शाहरूखबाबत असं बोलायची तुम्ही हिम्मतही करू शकत नाही..“वयाचा भेदभाव फक्त अभिनेत्रींसोबतच”file photo
Published on
Updated on

Taapsee Pannu Talk About Film Industry Double Standard

पुढारी ऑनलाईन : तापसी पन्नू मोठ्या पडद्यावर महिलांशी संबंधित मुद्दे मांडणाऱ्या चित्रपटांत काम करताना दिसते. खऱ्या आयुष्यातही ती अनेक विषयांवर स्पष्टपणे आपले मत मांडते. अलीकडेच तापसीने अभिनेत्रींबाबत होणाऱ्या वयाधारित भेदभावावर भाष्य केले.

Bollywood
Shekhar Suman | 'पूर्वी अभिनेत्रींचे शोषण व्हायचे, पण आज...' शेखर सुमन यांनी चित्रपटसृष्टीतील सांगितलं वास्तव

तापसी पन्नूने एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलताना सांगितले की, महिला कलाकारांबाबत भेदभाव होतो आणि ती स्वतःही अशाच आव्हानांना सामोरी जात आहे. तिच्या मते, वाढत्या वयामुळे तिला काही विशिष्ट प्रकारच्या भूमिका ऑफर केल्या जात नाहीत. निर्मात्यांना वाटते की ती अशा भूमिकांसाठी आता मोठी झाली आहे.

चित्रपटसृष्टीतील महिला कलाकार आणि पुरुष कलाकार असे दुहेरी निकष लावले जातात. वय वाढल्यानंतर रोमँटिक किंवा युवा प्रतिमेच्या भूमिका महिलांना कमी मिळतात. मात्र नायकांबाबत असे नाही त्‍यांना वय वाढल्यानंतरही रोमँटिक किंवा मुख्य भूमिका सुरू राहू शकतात. इंडस्ट्रित स्वतःची ओळख निर्माण करताना ३० वर्षांच्या आसपास पोहोचल्यावर या प्रकारच्या मर्यादा जाणवतात. मात्र काही तरुण अभिनेत्यांना वरिष्ठ अभिनेत्यांसोबत काम करणाऱ्या अभिनेत्रींसोबत काम करणे कमी पसंत असते.

Bollywood
Sonalee Kulkarni | १५२ किल्ले परत आणणाऱ्या महाराणी ताराराणींची पराक्रमी कारकीर्द लोकांसमोर येणे गरजेचे : सोनाली कुलकर्णी

चित्रपट उद्योगात वयाबाबत भेदभाव होतो : टाइम्स एंटरटेनमेंटला दिलेल्या मुलाखतीत तापसी म्हणाली, “तुम्ही इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण करेपर्यंत तुमचे वय ३० च्या आसपास पोहोचलेले असते. त्यानंतर लोक म्हणतात की तुम्ही रोमँटिक-कॉमेडी करण्याइतक्या तरुण राहिलेल्या नाहीत. पण पुरुष कलाकारांच्या बाबतीत असे होत नाही. चित्रपटसृष्टीत वयाबाबतचा भेदभाव हा मोठा मुद्दा आहे.”

शाहरुख खानचा दाखला : पुढे ती म्हणाली, “दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीतही माझ्याबरोबर असे घडत असे. मला एखाद्या वरिष्ठ अभिनेत्याच्या विरुद्ध कास्ट केले गेले की काही तरुण अभिनेते माझ्यासोबत काम करण्यास इच्छुक नसत.” त्यानंतर तिने बॉलिवूडचा उल्लेख करत म्हणाली, “शाहरुख खानबाबत अशी गोष्ट बोलण्याची हिंमतही कोणी करणार नाही.” या विधानातून तापसीने सुचवले की वयाधारित भेदभाव मुख्यतः अभिनेत्रींबाबत अधिक दिसून येतो, तर पुरुष कलाकारांच्या करिअरवर वयाचा तितका परिणाम होत नाही.

करिअर फ्रंटवर तापसी काय करते आहे?

‘अस्सी’ या चित्रपटात तापसीने वकिलाची भूमिका साकारली आहे. चित्रपट बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यावर व्यापक चर्चा घडवतो. ‘वो लड़की है कहां’ तिच्या आगामी प्रकल्पांपैकी एक आहे. तर ‘गांधारी’ हा तर तिचा आगामी चित्रपटांपैकी आणखी एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news