Shekhar Suman | 'पूर्वी अभिनेत्रींचे शोषण व्हायचे, पण आज...' शेखर सुमन यांनी चित्रपटसृष्टीतील सांगितलं वास्तव

Shekhar Suman | 'पूर्वी अभिनेत्रींचे शोषण व्हायचे, पण आज...' शेखर सुमन यांनी चित्रपटसृष्टीतील सांगितलं वास्तव
Shekhar Suman
Shekhar Suman revealed actresses used to get exploited earlier in film industry Instagram
Published on
Updated on
Summary

अभिनेते शेखर सुमन यांनी एका मुलाखतीत बॉलिवूडच्या जुन्या काळातील वास्तव मांडताना पूर्वी अभिनेत्रींचे शोषण होत असल्याचे सांगितले. पैसा आणि सत्तेचा प्रभाव चित्रपटसृष्टीत मोठ्या प्रमाणात असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र आज परिस्थिती बदलली असून कलाकारांना अधिक स्वातंत्र्य, पारदर्शकता आणि स्वतःचे निर्णय घेण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर आणि मनोरंजन क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे

Shekhar Suman revealed actresses used to get exploited earlier in film industry

अभिनेते शेखर सुमन सध्या त्यांच्या नव्या शोमुळे चर्चेत आहेत. याच शोच्या प्रमोशनसाठी झालेल्या संवादादरम्यान त्यांनी ओल्ड बॉलिवूड काळातील वास्तवाबद्दल खुलासा केला. बातचीत दरम्यान त्यांनी सांगितले की, पूर्वी बॉलिवूड एका विशिष्ट साच्यात काम करायचे. पूर्वी चित्रपट निर्मात्यांना सांगितले जायचे की, काही कथा चालणाऱ्या नाहीत. साचेबद्ध कथा ठरलेल्या असायच्या. म्हणजे, हिरो-हिरोईन, प्रेम, गाणी आणि खलनायक.

एक सुखद शेवट हा चित्रपटाच्या कथेचा खूपच महत्वाचा भाग नसायचा. कारण, चित्रपटातील कलाकारांवर लक्ष असायचे. ते किती प्रेक्षकांना आकर्षित करतात, याकडे लक्ष असायचे. त्याच कलाकारंमुळे चित्रपट चालत असत.

Shekhar Suman
Janhvi Kapoor in Peddi |केवळ ग्लॅमरपुरतीच भूमिका? ‘पेड्डी’मधील जान्हवी कपूरच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; प्रेक्षकांचा संताप

पण चित्रपट बनवण्यासाठी मोठे कलाकार आणि आर्थिकृष्ट्या महत्त्व असायचे. आज मात्र आपल्याला खूप स्वातंत्र्य आहे. आपण कथा सांगू शकतो. एकेकाळी हिंदी चित्रपटांवर राज्य करणाऱ्यांवर देखील त्यांनी टीका केली. ते म्हणाले, पूर्वीचे चित्रपट अनेकदा एका ठराविक चौकटीतच मर्यादित होते आणि प्रयोग करण्यास कचरत असत.

Shekhar Suman
Janhvi Kapoor in Peddi |केवळ ग्लॅमरपुरतीच भूमिका? ‘पेड्डी’मधील जान्हवी कपूरच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; प्रेक्षकांचा संताप

शेखर सुमन कलाकारांच्या शोषणाबद्दल म्हणाले-

शेखर सुमर म्हणाले की, "संधींच्या अभावामुळे अनेक कलाकारांचे शोषण होत असे. निर्माते अभिनेत्रींवर त्यांच्या इच्छेविरुद्ध हॉटेल्स आणि कॅफेमध्ये भेटण्यासाठी दबाव टाकत असत. पण अनेक प्रतिभावान लोकांना चित्रपटसृष्टीतील मर्यादेमुळे आणि इतर परिस्थितींमुळे चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली नसेल. आज दिग्दर्शक, निर्माते आणि लेखकांना स्वतःच्या अटींवर कथा तयार करण्याचे स्वातंत्र्य आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news