पुढारी ऑनलाईन डेस्क - ऑस्कर ॲवॉर्ड २०२४ मध्ये ‘लापता लेडीज’ नंतर आता स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची ऑफिशियल एन्ट्री झाली आहे. ऑस्करच्या रेसमध्ये एन्ट्री करणारा हा दुसारा भारतीय चित्रपट आहे.
२२ मार्च २०२४ रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. रणदीप हुड्डा (Randeep Hooda) ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantrya Veer Savarkar) यांच्या भूमिकेत होता. चित्रपट निर्मात्यांनी एक पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी फॅन्ससाठी दिलीय.
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ला ऑफिशियली ऑस्करसाठी पाठवण्यात आलं आहे. चित्रपटाचे पोस्टर आणि क्लॅपबोर्डसोबत रणदीप हुड्डा, संदीप सिंह आणि चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित (Anand Pandit) यांचा एक फोटो शेअर करून माहिती दिली.
पोस्ट शेअर करत निर्मात्यांनी लिहिलं, ‘सन्मानित आणि विनम्रता! आमचा चित्रपट स्वातंत्र्यवीर सावरकरला अधिकृतपणे ऑस्करसाठी सबमिट करण्यात आलं आहे. उल्लेखनीय प्रशंसासाठी फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे धन्यवाद. हा प्रवास अविश्वसनीय आहे. आम्ही त्या सर्वांसाठी खूप आभारी आहोत, ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला.’ आता ही पोस्ट पाहिल्यानंतर फॅन्सना आनंद झाला आहे. सर्व लोक चित्रपट निर्माते आणि रणदीप हुड्डाला शुभेच्छा देत आहेत. या चित्रपटामध्ये रणदीप हुड्डासोबत अंकिता लोखंडेही मुख्य भूमिकेत दिसली होती.