Swara Bhaskar : ट्रोल झाल्यानंतर स्वराने सोडले मौन

Swara Bhaskar
Swara Bhaskar
Published on
Updated on

बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या खूपच चर्चेत आहे. फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केल्यापासून ती चर्चेत आली आहे. यावेळी स्वराच्या पतीला भाई संबोधून केलेल्या ट्विटची जोरदार चर्चा होत आहे. वास्तविक, स्वराने 2 फेब्रुवारीला सोशल मीडियावर फहादला भाई म्हटले होते आणि याच्या काही दिवसांनीच तिने फहादसोबत लग्न करणार असल्याचे जाहीर केले होते. यानंतर ट्विटरवर युजर्सनी स्वरा आणि फहादला चांगलेच फटकारले. आता दोघांनीही यावर मौन सोडले आहे. फहाद अहमदने 'भाई' म्हटल्याच्या ट्विटवर मौन सोडले आहे. काहींनी तरी मान्य केले आहे की, हिंदू-मुस्लिम बहीण-भाऊ असू शकतात. पती-पत्नी गंमत करू शकतात, असे फहादने म्हटले आहे. स्वराने पती फहादची पोस्ट ट्विटरवर पुन्हा शेअर केली आहे आणि त्याला पाठिंबा दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news