सुरज चव्हाणच्या "झापुक झुपूक"चित्रपटामध्ये कलाकारांचा कल्ला पाहायला तयार राहा

Suraj Chavan Zapuk Zupuk Movie | पोस्टर पाहून चित्रपटाची उत्सुकता शिगेला
Suraj Chavan Zapuk Zupuk Movie
सुरज चव्हाणच्या "झापुक झुपूक"चित्रपटामध्ये दमदार कलाकारांची फ‍ळी पाहायला मि‍ळणार Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे ,केदार शिंदे दिग्दर्शित "झापुक झुपूक" या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दमदार टिझर आणि पोस्टर नंतर आता आणखी एक नवा धमाकेदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

फॅमिली एंटरटेनमेंटचा जबरदस्त तडका असलेल्या "झापुक झुपूक" या चित्रपटाच्या या नव्या पोस्टरमध्ये मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरे पहायला मिळत आहेत. केंदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूरज चव्हाणसह लोकप्रिय इतर कलाकार कल्ला करताना दिसणार आहेत. यामध्ये ‘पिरतीचा वनवा उरली पेटला’ मालिकेतील इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, ‘अबीर गुलाल’ मालिकेतील पायल जाधव, ‘तुमची मुलगी काय करते’ मालिकेतील जुई भागवत आणि दीपाली पानसरे, तसेच पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

पोस्टरमध्ये सूरज बैलगाडी ओढत आहे तर त्याच बैलगाडीवर बाकी सर्व कलाकार स्वार आहेत. सर्व कलाकारांच्या चेहऱ्यावर हसू आहे, ज्यामुळे नक्की चित्रपटाची कहाणी काय असणार आहे याची सर्वांना उत्सुकता आहे. आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे उत्तम युवा अभिनेत्यांमुळे हा चित्रपट नक्कीच सध्याची युवा पिढी आणि सिनेप्रेमींच्या पसंतीस उतरणार आहे. इतकेच नव्हे तर गुढी पाडव्यानिमित्त डोंबिवलीच्या शोभायात्रेत सूरज चव्हाण सहभागी झाला होता.

‘झापुक झुपूक’ २५ एप्रिल पासून प्रदर्शित होणार आहे !

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news