नाच गं घुमा : सुकन्या कुलकर्णी – सुप्रिया पाठारे पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर

सुकन्या कुलकर्णी - सुप्रिया पाठारे
सुकन्या कुलकर्णी - सुप्रिया पाठारे

पुढारी ऑनलाईन डेस्क : परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा' या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटात सुकन्या कुलकर्णी आणि सुप्रिया पाठारे या मराठीतील दोन ज्येष्ठ अभिनेत्री महत्त्वाच्या रोलमध्ये दिसणार असून त्या या चित्रपटाच्या निमिताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सारंग साठे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका या चित्रपटात आहेत. मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील आणि स्वप्नील जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. 'हिरण्यगर्भ मनोरंजन'निर्मित 'नाच गं घुमा' १ मे रोजी देशभर प्रदर्शित होत आहे.

"आम्ही दोघींनी खूप धमाल केली सेटवर. दोघींनाही सेटवर सर्व तयारीनिशी यायला आवडते. कुणी काही मागितले आणि आमच्याकडे ती गोष्ट नसेल, तर आम्हालाच खूप चुकल्यासारखे वाटते. आम्ही दोघी बिनधास्त जीवन जगणाऱ्या आहोत. आमच्यासमोर आव्हाने येतात ती आपण सक्षम आहोत म्हणून, असे मानून आम्ही त्यांना सामोरे जातो," सुकन्या कुलकर्णी सांगतात.

सुप्रिया पाठारे यांचे कौतुक करताना त्या म्हणतात, "आम्ही दोघींनी पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे. सुप्रियाचा बिनधास्तपणा मला आवडतो. जे काही असेल ते ती तोंडावर बोलून मोकळी होते, पण त्याचवेळी समोरची व्यक्ती दुखावणार नाही याची ती काळजी घेते. ती प्रत्येकाला मदत करायला सतत तयार असते. कुणालाही कुठलेही काम लागले तर हिच्याकडे त्याचे सोल्युशन असते. मग ते घर असो किंवा एखाद्या रुग्णालयातील मदत असो. ठाण्यातील कित्येक कलाकार तर हिच्यावर विविध गोष्टींसाठी अवलंबून असतात. कामाच्या बाबतीतही ती तेवढीच प्रामाणिक असते. आळस नाही, कारणे नाहीत की जीवावरचे करणे नाही. आणि हो, दुपारची वामकुक्षी ही तीची खाशियत आहे."

सुकन्या कुलकर्णी यांच्याबद्दल बोलताना सुप्रिया पाठारे म्हणतात की, सुकन्या कुलकर्णी यांच्यातील साधेपणा त्यांना फार आवडतो. "कुठेही जायचे असेल आणि काही करायचे असेल तर ती हातचे राखून करत नाही. आपण मोठ्या कलाकार आहोत, वयाने मोठ्या आहोत, याचा कोणताही गर्व तिला नसतो. सुप्रिया पाठारे सांगतात. त्या म्हणतात की त्यांनी सेटवर जो पंचपक्वान्नांचा अनुभव घेतला तो त्यांना 'नाच गं घुमा'च्या पटकथेत अनुभवायला मिळाला. "ही स्क्रिप्ट म्हणजे पंचपक्वान्न होती आणि काय करू आणि काय नको अशी आमची एकूण स्थिती होती,"त्या म्हणाला.

सुकन्या कुलकर्णी त्यांचा अनुभव सांगताना म्हणाल्या की, या बायकांचे कष्ट पाहून थक्क व्हायला होते. "आमच्याकडे काम करणाऱ्या बाईंची इमारत पुनर्विकासात गेली म्हणून त्या ठाण्याला राहायला गेल्या पण त्यांनी आमची कामे सोडलेली नाहीत. सकाळी ३ वाजता उठून पाणी भरून, घरची कामे करून सकाळी ६.३० ची ट्रेन पकडून त्या येतात. पण तरीही कुठेही थकवा नसतो. सतत हसतमुख असत्तात. त्या आता आमच्यासाठी आमच्या घरातील सदस्य झाल्या आहेत. त्यांच्यासाठी सकाळचा नाश्ता आमच्या घरातच बनतो. आम्ही घरी नसू तेव्हा त्यांना सांगितलेले असते की तुमचे तुम्ही करून घ्या."

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news