

सनी लिओनी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. मात्र, आता तिचे लिंक्डइनने अकाऊट थेट ब्लॉक केले आहे. फेसबुक, इन्स्टाग्रामप्रमाणेच सनी लिंक्डइनवरही सक्रिय असते. लिंक्डइनवरतीही सनीचे भरपूर फॉलोअर्स आहेत; पण आता अचानक तिचे अकाऊंट ब्लॉक झाल्याने सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहे. लिंक्डइन अकाऊंट ब्लॉक झाल्याची माहिती तिने सोशल मीडियावरून दिली. तिने तिच्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला.
ती म्हणाली, लिंक्डइनवर काही महिने खूप छान वेळ घालवल्यानंतर आता त्यांनी माझे अकाऊंट ब्लॉक केले आहे. त्यांना वाटले की मी खरी सनी लिओनी नाही; पण ती मीच होते. सनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकरी नाराजी व्यक्त करत आहेत. हे त्यांनी खूप चुकीचे केले. अकाऊंट ब्लॉक करण्यापूर्वी त्यांनी एकदा तपासून पाहायला हवे होते, असे एकाने तर दुसरा नेटकरी म्हणाला, 'बरे झाले तुम्ही याबद्दल बोललात.!'