sunny leone
मनोरंजन
Sunny Leone : सनी लिओनी प्रभुदेवासोबत “पेट्टा रॅप” डान्स नंबरमध्ये!
पुढारी ऑनलाईन डेस्क : "पेट्टा रॅप" स्पेशल डान्स नंबरमध्ये सनी लिओनी दिसणार आहे. ती तिच्या फूट टॅपिंग चार्टसाठी प्रसिद्ध आहे आणि ती आणखी एका आकर्षक डान्स मधून प्रेक्षकांच मनोरंजन करणार आहे. यावेळी ती आगामी डान्स नंबर "पेट्टा रॅप" मध्ये डान्स आयकॉन प्रभुदेवासोबत झळकणार आहे. (Sunny Leone)
नुकताच निर्माते आणि अभिनेत्रीने चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करून याची घोषणा केली आहे. सनी नव्या प्रोजेक्टबद्दल म्हणते, "आम्ही हा फास्ट बीट नंबर थायलंडमध्ये शूट केला आहे. मी प्रभुदेवा सरांची खूप मोठी चाहती आहे. त्याच्या कामातील नाविन्यपूर्ण पद्धत आणि इलेक्ट्रिक डान्स मुव्ह्जसाठी ओळखले जातात आणि त्याच्याशी माझ्या स्टेप्स जुळवण्याचा मी प्रयत्न करत होते."

