'डर' चित्रपटादरम्यानचा वाद, ३२ वर्षानंतर 'या' बॉलीवुड अभिनेत्यांमध्ये होणार पॅचअप

Actor sunny deol work with shahrukh khan | अभिनेता 'सनी देओल'ने व्यक्त केली शाहरुख खानबरोबर काम करण्याची इच्छा
Actor sunny deol work with shahrukh khan
३२ वर्षानंतर अभिनेता सनी देओलची 'या' बॉलीवुड अभिनेत्यासोबत काम करण्याची इच्छा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: Actor sunny deol work with shahrukh khan | अभिनेता सनी देओल लवकरच 'जाट' चित्रपटाद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट खूप जवळ आली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने फिल्म इंडस्ट्रीतील 'या' अभिनेत्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सनी देओल यांनी 'त्या' अभिनेत्याचे नाव घेतले आहे ज्याच्याशी तो जवळजवळ १६ वर्षांपासून बोललाही नव्हता. पण आता त्याला त्याच्यासोबत आणखी एक चित्रपट करायचा आहे आणि तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आहे.

१६ वर्षांपासून दोघांमध्ये होता दुरावा

शाहरुख खान आणि सनी देओल यांनी 'डर' चित्रपटात एकत्र काम केले होते. १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि तो दुरावा इतका वाढला की, त्यांनी १६ वर्षे एकमेकांशी बोललेही नाही. तथापि, आता त्यांच्यात सर्व काही सामान्य आहे. सनी देओलनेही अलीकडेच शाहरुख खानसोबत पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे उघड केले.

सनी देओलला शारूखसोबत आणखी एक चित्रपट करण्याची इच्छा

अभिनेता सनी देओलला मुलाखतीवेळी विचारण्यात आले की, दोन नायकांच्या चित्रपटात तो कोणत्या अभिनेत्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करू इच्छितो? यावर सनी देओलने न डगमगता सांगितले, 'मी हे कोणासोबत करेन हे मी ठरवणार नाही... म्हणजे, मला हे करायला आवडेल.' मला वाटतं ज्यांनी... शाहरुखसोबत फक्त एकच चित्रपट केला असेल, तर आपण आणखी एक करू शकतो. सनी देओल आठवणींना उजाळा देत म्हणाला, 'ते छान होईल कारण तो एक वेगळा काळ होता आणि आता तो एक वेगळा काळ आहे, त्यामुळे नक्कीच ते छान होईल'.

दोघांमध्ये कोणत्या घटनेवरून नाराजी?

'डर' चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये शाहरुख खान आणि सनी देओल यांच्यात भांडण होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी सनी देओल म्हणाला होता की शाहरुख त्याच्यावर समोरून हल्ला करू शकत नाही, कारण चित्रपटात तो एक प्रशिक्षित नौदल अधिकारी आहे. यावर शाहरुख खान म्हणाला होता की, 'मी शक्ती कपूर, प्रेम चोप्रा किंवा गुलशन ग्रोव्हर नाहीये जो मागून हल्ला करेन'. या मुद्द्यावरून दोघांमधील नाराजी वाढत गेली आणि सुमारे १६ वर्षे टिकली. 'डर' हा चित्रपट नुकताच पुन्हा प्रदर्शित झाला. मात्र, यावेळी चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. 'जाट' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, तो १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news