पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा गेल्या वर्षी 'गदर २' या चित्रपटाने प्रचंड यश मिळविले. यानंतर सनीच्या आगामी 'बॉर्डर २' चित्रपटाचा सीक्वल बनवण्याची निर्मात्यांनी घोषणा करून चाहत्यांचा आनंद द्विगुणीत केला. आता चाहत्याची प्रतिक्षा संपली असून 'बॉर्डर २' हा चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. यामुळे सनीच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी नुकतेच एक्स (x) ट्विटरवर आगामी 'बॉर्डर २' चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. यात त्यांनी लिहिलंय की, "सनी देओल, जेपी दत्ता, भूषण कुमार यांच्या 'बॉर्डर २' चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट पुढच्य वर्षी २३ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. भारतातील सर्वात मोठा युद्धावर आधारित हा चित्रपट असून प्रजासत्ताक दिनीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. यामुळे या चित्रपटाला वीकेंडचा फायदा होणार आहे." यावरून सनीचा 'बॉर्डर २' चित्रपट पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित होणार आहे. यामुळे सनीच्या चाहत्यांचा उत्सुकता वाढली आहे.
याआधी १३ जून रोजी 'बॉर्डर २' या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर सनी देओलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांने लिहिले होतं की, "एक सैनिक पुन्हा येत आहे. आपले २७ वर्ष जुने वचन पूर्ण करण्यासाठी… भारतातील सर्वात मोठा युद्धावर आधारित चित्रपट बॉर्डर २." आधीच्या 'बॉर्डर' चित्रपटातील 'संदेश आते हैं' हे प्रसिद्ध गाणे आजही चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे.
हेही वाचा