

पुढारी ऑनलाईन डेस्क - महाठग सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने मोठा खुलासा केला आहे. तिने २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिच्याविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्राला आव्हान दिले आहे. सुकेशवर आरोप आहे की, त्याने कोटी रुपयांचा घोटाळा केला आणि अवैध कमाईने अभिनेत्रीला अनेक लक्झरी गिफ्ट्स दिले. आता जॅकलीनने महागड्या गिफ्ट्सवर खुलासा केला आहे की, ती या अज्ञात होती की, हा पैसा आणि गिफ्ट्स अवैध मार्गाने आले होते. आता तिच्या या भूमिकेनंतर तपास सुरु आहे.
दिल्लीतील एका कोर्टाने २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिसच्या वकिलाने सांगितले की, सुकेशकडून जे गिफ्ट्स मिळाले होते, त्याबाबत अभिनेत्रीला हे माहिती नव्हतं की, ते बेकायदेशीर मार्गाने देण्यात आले आले आहेत. जे या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा हिस्सा आहे.
्
रिपोर्टनसार, कोर्टाच्या सुनावणीत न्यायाधीशांनी प्रश्न उपस्थित केला की, एडल्ट पर्सन म्हणून तुमची ही जबाबदारी नाही का की, जे गिफ्ट्स मिळत आहेत, ते कुठून आले?
प्रशांत पाटील आणि शक्ती पांडे यांच्यासह वकील सिद्धार्थ अग्रवाल यांनी जॅकलिन फर्नांडिसची बाजू मांडली. त्यांनी युक्तीवाद केला की, अभिनेत्रीला माहित नाही की, तिला मिळालेले गिफ्ट्स गुन्ह्यातील कमाईचा भाग आहेत. तिला सुकेश चंद्रशेखरकडून मिळालेले गिफ्ट्स हे आदिती सिंग यांच्याकडून कथितपणे उकळलेल्या पैशातून विकत घेतले गेल्याचे माहीत नव्हते. हायकोर्ट आता २६ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी करेल.