

पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलीवूड स्टार अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या हॉरर कॉमेडी चित्रपट स्त्री २ मुळे चर्चेत आहे. स्त्री २ च्या यशामुळे श्रद्धा कपूरची लोकप्रियता आणखी वाढली आहे. परिणामी, सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची संख्या इतकी वाढली आहे की, अभिनेत्री श्रद्धा कपूरने इन्स्टाग्राम फॉलोअर्सवर दिग्गज सेलिब्रिटींनाही मागे टाकले आहे.
स्त्री २ च्या यशानंतर श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर ९१.५ मिलियन फॅन्स झाले आहेत. अभिनेत्रींमध्ये इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स प्रियांका चोप्राचे आहेत.
इन्स्टाग्रामवर कुणाचे सर्वाधिक फॉलोअर्स प्रियंका चोप्रा- ९१.८ मिलियन श्रद्धा कपूर- ९१.५ मिलियन आलिया भट्ट- ८५.१ मिलियन कॅटरीना कैफ- ८०.४ मिलियन दीपिका पादुकोण- ७९.८ मिलियन स्त्री-२ कलेक्शन दरम्यान, सरकटेच्या भितीची कहाणी, हॉरर कॉमेडी चित्रपट स्त्री २ चे सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसचे कलेक्शन तगडे झाले आहे. स्त्री २ जवळपास ३०० कोटींच्या जवळपास पोहोचले आहे. १५ ऑगस्ट रोजी स्त्री २ सोबत रिलीज झालेला जॉन अब्राहमचा वेदा आणि अक्षय कुमारचा कॉमेडी चित्रपट खेल खेल में कमाईबाबतील पिछाडीवर राहिला आहे.