

पुढारी ऑनलाईन डेस्क - राजकुमार राव -श्रद्धा कपूरचा हॉरर कॉमेडी 'स्त्री २' बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड तोडत आहे. अमर कौशिकच्या या चित्रपटाने शुक्रवार, २३ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. आज नवव्या दिवशीही कमाईचा गल्ला भरत आहे. १५ ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने ग्लोबल आकडा ४०० कोटी रुपये पार केले आहेत. भारतात ३०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे.
प्रोडक्शन हाऊस मॅडॉक फिल्म्सने गुरुवारी शेअर केलं की, भारतात ३४२ कोटी रुपये आणि परदेशांत ५९ कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर 'स्त्री २'ने रिलीजच्या सातव्या दिवसांच्या आत जगभरात एकूण ४०१ कोटी रुपयांची कमाई केली. गुरुवारी ४१७ कोटीपर्यंत आकडा पोहोचला. शुक्रवारी चित्रपटाने १६.५० कोटींची कमाई केली. भारतात एकूण कलेक्शन ३०८.१५ कोटी रुपये झाले आहे.
एकूण नऊ दिवसांच्या कलेक्शनचा विचार करता 'स्त्री-२' ने शाहरुख खानचा 'जवान', रणबीर कपूरचा 'ॲनिमल', एसआरकेचा 'पठान', सनी देओलचा 'गदर २', प्रभासचा 'बाहुबली २: द कन्क्लूजन' हिंदी वर्जन आणि यशचा KGF ला मो टाकले आहे.
'स्त्री २' ची मुख्य अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आतापर्यंत सर्वात अधिक कमाई करणारा चित्रपट प्रभासचा 'साहो' होता. सर्व भाषांमध्ये ३१०.६० कोटी, हिंदी डब वर्जन १४५.६७ कोटी रुपये कमावले होते. आपल्या अनेक बॉक्स ऑफिस रेकॉर्ड दरम्यान 'स्त्री २' हा चित्रपट २०२४ चा दुसरी सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला.