

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'स्त्री २' बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवत आहे. 'स्त्री २' चे सर्व शो बाहेर हाऊसफुल्ल बोर्ड लागले आहेत. श्रद्धा कपूरचा हॉरर कॉमेडी शानदार कलेक्शन करत आहेत. आठव्या दिवशीचे कलेक्शन किती झाले आहे, जाणून घेऊया.
'स्त्री २' च्या प्रेक्षकांवर चित्रपटाचे जादू झाले आहे. चित्रपटाच्या कहाणीमध्ये दमदेखील आहे. स्टारकास्टचे परफॉर्मन्सदेखील शानदार आहे. रिपोर्टनुसार, दुसऱ्या आठवड्यात 'स्त्री २' ने एका आठवड्यात २८९.६ कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या गुरुवारी कमाईचे आकडे आले आहेत.
'स्त्री २' ने रिलीजच्या ८ व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या गुरुवारी १८.२ कोटींची कमाई केली आहे. एकूण कलेक्शन आता ३०८ कोटी रुपये झाले आहे. तर वर्ल्डवाईड ४२८ कोटींची कमाई झाली आहे.