स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२४
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२४

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा : प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता ठरली सर्वोत्कृष्ट आई

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२४ नुकताच जल्लोषात पार पडला. पुरस्कार सोहळ्याचं यंदाचं हे चौथं वर्ष. ठरलं तर मग ला महामालिकेचा पुरस्कार बहाल करण्यात आला. विशेष म्हणजे हा पुरस्कार देण्याचा मान महामालिकेसाठी व्होट करणाऱ्या तीन भाग्यवान प्रेक्षकांना देण्यात आला.

मराठी टेलिव्हिजच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या हस्ते कलाकारांना पुरस्कार देण्यात आला. सिद्धार्थ जाधवला महाराष्ट्राचा धमाका या पुरस्काराने गौरवण्यात आलं.

लग्नाची बेडी मालिकेतील सिंधू ठरली महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व. पिंकीचा विजय असो मालिकेतील पिंकी आणि युवराज ठरले महाराष्ट्राची लक्षवेधी जोडी.

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सुनेचा पुरस्कार पटकावला मुरांबा मालिकेतील रमाने, तर अबोली मालिकेतील अबोलीची सासू म्हणजेच रमा आई ठरली सर्वोत्कृष्ट सासू.

सर्वोत्कृष्ट पती ठरला मन धागा धागा जोडते नवा मालिकेतील सार्थक तर सर्वोत्कृष्ट पत्नीचा पुरस्कार शुभविवाहच्या भूमीला देण्यात आला.

सर्वोत्कृष्ट आई या पुरस्काराची मानकरी ठरली प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता आणि मन धागा धागा मालिकेतील अण्णा ठरले सर्वोत्कृष्ट बाबा.

लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेतील कलाला सर्वोत्कृष्ट मुलगी हा पुरस्कार देण्यात आला.

ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन सायलीला सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार देण्यात आला. तर आपल्या स्टायलिश अंदाने प्रेक्षकांची मन जिंकणारे नित्या-अधिराज ठरले सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी पुरस्काराचे विजेते.

सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार शुभविवाह मालिकेतील रागिणी आणि प्रेमाची गोष्ट मालिकेतील सावनी यांना विभागून देण्यात आला.

लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेतील कला, नयना आणि काजल यांना सर्वोत्कृष्ट भावंडं पुरस्कार देण्यात आला तर ठरलं तर मग मालिकेतील सुभेदार कुटुंब ठरलं सर्वोत्कृष्ट परिवार.

सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य हा पुरस्कार प्रेमाची गोष्ट मालिकेतील सागर आणि कुण्या राजाची गं तू रानी मालिकेतील गुंजाला देण्यात आला.

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात फेव्हरेट ग्लॅमरस फेस ठरली प्रेमाची गोष्ट मालिकेतील सावनी आणि तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील मल्हार.

मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या कार्यक्रमासाठी वैदेही परशुरामी आणि बालकलाकार सारा पालेकरला सर्वोत्कृष्ट निवेदकाचा पुरस्कार बहाल करण्यात आला. स्टार प्रवाह परिवार पुरस्कारासाठी श्रीरंग गोडबोले, मंगल केंकरे, विजय पाटकर, वैजयंती आपटे, मिलिंद इंगळे यांनी परीक्षण केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news