Sridevi birth anniversary | बोनी, खुशी कपूरने शेअर केली श्रीदेवींची 'गोल्डन मेमरी'; फोटो पोस्ट करत सांगितला 'तो' किस्सा

Sridevi birth anniversary | बोनी कपूरने शेअर केली खास क्षणांची ओंजळ; फोटो पोस्ट करत सांगितला 'तो' किस्सा
image of Sridevi - boney kapoor
Sridevi birth anniversary Instagram
Published on
Updated on

मुंबई - बॉलीवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज १३ ऑगस्ट रोजी ६२ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांचे पती, चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी खास क्षणांची आठवण केली. त्यांनी श्रीदेवी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत विशेष आठवण सांगितली आहे. बोनी यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही फोटो पोस्ट पाहता येईल. बोनी यांनी पोस्ट मध्ये काय म्हटलं?

image of Sridevi - boney kapoor
Kaun Banega Crorepati 17 | स्वातंत्र्य दिनी हॉट सीटवर कर्नल सोफिया कुरैशी उलगडणार 'ऑपरेशन सिंदूर'चे किस्से

बोनी कपूर श्रीदेवींबद्दल काय म्हणाले?

१९९० मध्ये चेन्नईमध्ये तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत मी तिला २६ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तर तो तिचा २७ वा वाढदिवस होता, जेणेकरून तिला असे जाणवू दिले की, ती तरुण झाली आहे आणि ही एक प्रशंसा होती. प्रत्येक दिवसाबरोबर ती तरुण होत जात आहे पण तिला जाणवलं, की मी तिला चिडवत होतो.

image of Sridevi - boney kapoor
Kangana Ranaut on Jaya Bachchan | जया बच्चन यांनी सेल्फी घेणाऱ्याला दिला जोरदार धक्का; संतापलेली कंगना म्हणाली-
Admin

खुशी कपूरने इन्स्टा स्टोरीवर शेअर केले फोटो

खुशी कपूरने तिच्या इन्स्टा स्टोरीवर श्रीदेवी यांचा एक सिंगल फोटो पोस्ट केला आहे. शिवाय, बालपणीचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये जान्हवी आणि श्रीदेवी दिसत आहेत.

Admin

नेटकऱ्यांनी केली आठवण

बोनी कपूर यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये श्रीदेवी सूटमध्ये दिसतात. त्यांच्या समोर बोनी कपूर खिशात हात घालून उभे आहेत. काही तासातचं या फोटंना खूप साऱ्या लाईक्स आल्या आहेत. कॉमेंट बॉक्स मध्ये नेटिझन्स प्रतिक्रिया देत आहेत. एकाने म्हटले आहे, "श्रीदेवी जी त्या अभिनेत्रींपैकी आहे, त्या रिअलमध्ये कधी म्हाताऱ्या झाल्या नाहीत." अनेकांनी रेड हार्ट इमोजी शेअर केलीय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news