Sreeleela-Karti Aryan | कार्तिक साऊथ ब्युटी श्रीलीला करतोय डेट? आईने सांगितलं...
पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा साऊथ ब्युटी श्रीलीलामुळे चर्चेत आला आहे. त्याला IIFA 2025 ॲवॉर्ड्समध्ये भूल भुलैया ३ चित्रपटातील रूह बाबाच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्तिक आर्यन खरंच श्रीलीलाला करतोय डेट? आई काय म्हणाली?
रोमँटिक ड्रामामध्ये कार्तिक सोबत साऊथची अभिनेत्री श्रीलीलादेखील दिसणार असून दोघांच्या डेटींगची चर्चा रंगलीय. त्यांनी या चर्चेदरम्यान, कार्तिकची आई काय म्हणाली? कार्तिकची आई माला तिवारी जयपूरमध्ये IIFA सिल्वर जुबली समारंभात सहभागी झाली. यावेळी कार्तिकने करण जोहरसोबत शो होस्ट केला. जेव्हा दिग्दर्शकाने विचारलं की, तो आपल्या होणारी सून कशी हवीय? तेव्हा त्या म्हणाल्या, “परिवाराची मागणी एका खूप चांगल्या डॉक्टरची आहे.”
तत्काळ नेटिजन्सनी त्यांच्या या उत्तराला श्रीलीला सोबत जोडलं. रिपोर्टनुसार, श्रीलीला देखील डॉक्टर होण्यासाठी एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे.
कार्तिकच्या फॅमिली पार्टीमध्ये श्रीलीलाची हजेरी
कार्तिकच्या कौटुंबिक समारंभात श्रीलीलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये ती अन्य पाहुण्यांसोबत डान्स करताना दिसली. कार्तिक - श्रीलीला आता दिग्दर्शक अनुराग बसुसोबत रोमँटिक ड्रामामध्ये दिसणार आहेत.

