Squid Games season 3 Releasing on Netflix
जगभरात नावाजलेल्या स्क्विड गेम या कोरियन सीरिजच्या तिसऱ्या सीझनची जगभरातील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या सिरिजचा मोठ्या प्रमाणात भारतीय प्रेक्षकवर्गही आहे.
ही सिरिज आज म्हणजेच 27 जून 2025ला जगभरात वेगवेगळ्या वेळेत रिलीज होणार आहे. या सिरिजचे भारतात रिलीज होण्याची वेळ भारतीय प्रमाणवेळ पद्धतीनुसार दुपारी 12.30 ही असणार आहे. नेटफ्लिक्स वर ही सिरिज पाहता येईल. तर यूके मध्ये ही सिरिज सकाळी 8 वाजता, तर सेंट्रल युरोपमध्ये सकाळी 9 वाजता रिलीज होणार आहे.
ऑस्ट्रेलियाचे प्रेक्षक ही सिरिज संध्याकाळी 5 वाजता बघू शकतात. तर न्यूझीलंडमध्ये या सिरिजच्या प्रक्षेपणाची वेळ संध्याकाळी 7 आहे. तर ब्राजील, अर्जेंटिना आणि साऊथ आफ्रिकेत ही सिरिज अनुक्रमे पहाटे 4, 5 आणि 10 वाजता रिलीज होणार आहे.
बहुप्रतीक्षित तिसऱ्या सीझनमध्ये जवळपास 6 एपिसोड असतील. इतके कमी एपिसोड असलेला हा पहिलाच सीझन आहे. या सिरिजच्या पहिल्या सीझनमध्ये 9 एपिसोड होते तर दुसऱ्या सीझनमध्ये 7 एपिसोड होते.
या सिरिजचे निर्माते यांनी पहिल्या सीझननंतर सिरिज थांबवण्याचा निर्णय घेतला होता. पण या सिरिजला जगभरातून इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की निर्मात्यांना त्यांचा हा निर्णय बदलावा लागला. पहिल्या सीझनच्या यशानंतर दूसरा आणि तिसरा सीझन एकत्रच लिहिले गेले होते.
असे बोलले जात आहे की हा सीझन या सिरिजचा शेवटचा सीझन असणार आहे. सर्व्हायवल प्रकारात मोडणाऱ्या या सिरिजचा जॉनर जगभरात लोकप्रिय झाला.
Gi-hun ने सीझनच्या अखेरीस आपल्या जवळच्या मित्राला गमावले. यादरम्यान त्याला फ्रंट मॅन नक्की कोण आहे हे देखील समजले आहे. आता सीझन 3 मध्ये Gi-hun ला हा गेम संपवून मित्रांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे. त्यामुळे हा सीझन आधीच्या सीझनपेक्षा जास्त थरारक आणि क्रूर टास्कने भरलेला असेल यात शंका नाही.
ली जंग-जे (Gi-hun )
ली ब्युंग-हुन (Front Man )
वी हा-जून (जून-हो, पोलिस अधिकारी )
कांग हा-न्यूल ((Dae-ho)
पार्क ग्यू-यंग (No-eul )
जो यू-री ((Jun-hee )
यांग डोंग-ग्यून (Yong-sik )