Actor srikanth arrest : दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला ड्रग्ज प्रकरणात अटक

दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Actor srikanth arrest
Actor srikanth arrest file photo
Published on
Updated on

Actor srikanth arrest

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ग्रेटर चेन्नई पोलिसांनी सोमवारी (दि. २४) एका सुरू असलेल्या तपासात मिळालेल्या महत्त्वाच्या माहितीच्या आधारे ही अटक केली.

AIADMK च्या आयटी विंगच्या सदस्याशी संबंध

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, AIADMK च्या आयटी विंगचा पदाधिकारी टी. प्रसाद याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ही कारवाई झाली. प्रसादवर श्रीकांतला प्रतिबंधित अंमली पदार्थ पुरवल्याचा आरोप आहे. प्रसादच्या चौकशीदरम्यान, अधिकाऱ्यांना अभिनेत्याच्या ड्रग्ज नेटवर्कमधील सहभागाचे पुरावे सापडले. या माहितीच्या आधारे अभिनेता श्रीकांतला ताब्यात घेण्यात आले. नुंगमबक्कम पोलीस ठाण्यात त्याची नऊ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान पोलिसांनी त्याच्या रक्ताचे नमुने घेतले. नंतर या नमुन्यांची तपासणी केली असता, त्यात अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले.

Actor srikanth arrest
Mumbai Film City fire : मुंबई फिल्मसिटीत भीषण आग, अनुपमा मालिकेचा सेट जळून खाक

७ जुलैपर्यंत कोठडी

कायदेशीर प्रक्रियेनुसार, श्रीकांतला न्यायालयात दंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यापूर्वी किलपॉक मेडिकल कॉलेज रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. चेन्नईतील एग्मोर येथील ज्युडिशियल ऑफिसर्स क्वार्टर्समधील दंडाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी सुनावणी झाली. वकील विघ्नेश रामनाथन यांनी श्रीकांतची बाजू मांडली. सुनावणीनंतर, त्याला ७ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अभिनेत्याबद्दल थोडक्यात

४६ वर्षीय श्रीकांतने १९९९ मध्ये दिग्दर्शक के. बालचंदर यांच्या 'जन्नल - मराबू कविताइगल' या दूरचित्रवाणी मालिकेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये, विशेषतः तमिळ चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. २००२ मध्ये 'रोजा कूटम' या रोमँटिक ड्रामाद्वारे त्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले, ज्यामुळे त्याला लोकप्रियता मिळाली आणि तमिळ चित्रपटसृष्टीत त्याचे स्थान निर्माण झाले. त्याने 'आनंदपुरम डायरीज', 'उप्पूकंदम ब्रदर्स बॅक इन ॲक्शन' यांसारख्या अनेक मल्याळम चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रदीप चिलकुरी दिग्दर्शित 'अर्जुन S/O वैजयंती' हा त्याचा अलीकडचा चित्रपट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news