दाक्षिणात्य दिग्दर्शकाचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण, गूगल आई चित्रपट आणणार

दाक्षिणात्य निर्माता, दिग्दर्शकाचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण
दाक्षिणात्य निर्माता, दिग्दर्शकाचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना पॅन इंडिया ओळख मिळाली आहे. दाक्षिणात्य चित्रपट बॉलीवूडला टक्कर देत असले तरी मराठी चित्रपट कंटेंटच्या जोरावर आपले वेगळेपण टिकवून आहेत. मराठी चित्रपटांचे हेच वेगळेपण लक्षात घेऊन पहिल्यांदाच दाक्षिणात्य निर्मिती संस्था, निर्माते आणि दिग्दर्शक एक हटके मराठी चित्रपट घेऊन येत आहेत. 'गुगल आई' असे या चित्रपटाचे नाव असून यामध्ये अभिनेता प्रणव रावराणे चित्रपटात बघायला मिळणार आहे.

आंध्र प्रदेश येथील प्रसिद्ध निर्माते सी दिवाकर रेड्डी हे आपल्या डॉलर्स मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि या संस्थेच्या माध्यमातून 'गुगल आई'ची निर्मिती करत आहेत. तर गोविंद वराह यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तेलगू , तामिळ आणि कन्नड भाषेतील चित्रपट त्यांनी यापूर्वी दिग्दर्शित केले आहेत.

माय लेकीच्या नात्याचा आणि आई मुलीच्या गोडव्याचा वेगळा प्रवास 'गूगल आई' या हटके टायटल असलेल्या चित्रपटामधून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा व पटकथा गोविंद वराह यांचीच आहे. अमित नंदकुमार बेंद्रे यांनी संवाद लिहिले आहेत. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते सचिन अशोक वाडकर आहेत तर असोसिएट दिग्दर्शक म्हणून अर्जुन भोसले हे काम पाहत आहेत. चित्रपटात चार गाणी असून ती सागर शिंदे यांनी संगीतबद्ध केली आहेत. नृत्य दिग्दर्शन मयूर आडागळे हे करणार आहेत.

दिग्दर्शक गोविंद वराह म्हणाले की, अनेक सिनेमांमधून आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे प्रवण रावराणे प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट प्रणवने आतापर्यंत केलेल्या कामांपेक्षा वेगळा असेल. तसेच ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर, अश्विनी कुलकर्णी यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्रासह हैद्राबाद, सिकंदराबाद व आसपासच्या भव्य लोकेशनवर होणार असल्याचे गोविंद वराह यांनी सांगितले.

निर्माते सी दिवाकर रेड्डी म्हणाले, मराठी माणसे पहिल्यापासून मदतीला धावून येण्यास तत्पर असतात. हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे. याला ही रसिकांनी अशीच भरभरून दाद द्यावी, ही गणपती बाप्पा आणि व्यंकटेश भगवान चरणी प्रार्थना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news