दाक्षिणात्य अभिनेत्री कायदू लोहारचं ‘I प्रेम U’द्वारे मराठीत पदार्पण

दाक्षिणात्य अभिनेत्री कायदू लोहार
दाक्षिणात्य अभिनेत्री कायदू लोहार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : I प्रेम U चित्रपट, कायदू लोहार, अभिजित अमकर, नितीन कहार, प्रेम म्हणजे न सुटणारं समीकरण असं गणितज्ज्ञ सांगतात, तर प्रेमात पडण्याचा गुरुत्वाकर्षाशी संबंध नाही असं आईन्स्टाईन सांगतात. त्यामुळे प्रेम म्हणजे काय? याची गोष्ट "I प्रेम U" या अनोख्या चित्रपटात मांडली जाणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री कायदू लोहार या चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण करत असून, कायदू आणि अभिजित अमकर ही फ्रेश जोडी या चित्रपटात आहे. येत्या १७ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

"I प्रेम U" या चित्रपटाचा टीजर लॉन्च करण्यात आला. या चित्रपटाची निर्मिती साईश्री एंटरटेन्मेंटच्या मधुकर गुर्सल, नितीन कहार यांनी केली आहे. नितीन कहार यांनीच लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. अविनाश सातोसकर यांनी छायांकन, संजू-संग्राम आणि यशोधन कदम यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.

आसाममधील तेजपूर येथे जन्म झालेल्या कायदू लोहारनं दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. मुगीलपेटे, पोथानपाथम नूट्टांडू, अलुरी असे कन्नड, मल्याळममधील चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

त्यानंतर आता ती मराठीत पाऊल टाकत आहे. तिच्याबरोबर एक सांगायचंय, टकाटक अशा चित्रपटांतील अभिनयाचं कौतुक झालेला अभिनेता अभिजित अमकर या चित्रपटात दिसणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news