Movie Sajana Title Song | प्रेमातील हळव्या भावनांना स्पर्श करणारं "सजना" चित्रपटाचे टायटल सॉन्ग रिलीज

Movie Sajana Title Song | संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारा "सजना" चित्रपटाचे टायटल साँग प्रदर्शित करण्यात आला आहे.
image of Movie Sajana
"सजना" चित्रपटाचे टायटल सॉन्ग रिलीज करण्यात आलेinstagram
Published on
Updated on

Movie Sajana Title Song released

मुंबई :

संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारा "सजना" चित्रपटाचा टायटल साँग प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रेमातील हळव्या भावनांना स्पर्श करत, या गीतामध्ये प्रेमातील गोडवा, आठवणी, आणि नात्यांमधील निखळपणा अगदी हृदयस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आला आहे. गाण्याचं चित्रिकरण देखील अत्यंत नयनरम्य आहे.

गायक सोनू निगम आणि राजेश्वरी पवार यांच्या भावस्पर्शी आवाजात सजलेले हे गाणं प्रेमाची नाजूक आणि गहिरं भावना व्यक्त करते. या गाण्याला संगीत दिलं आहे ओंकारस्वरूप यांनी, तर गाण्याचे बोल लिहिले आहेत सुहास मुंडे यांनी. "सजना" हे गाणं केवळ एक संगीतकृती नसून, प्रेमाच्या भावना, आठवणी आणि नात्यांची गुंफण उलगडणारं एक सुंदर चित्रण आहे.

image of Movie Sajana
Actress Anita Date Jarann Movie | 'टाचण्यांनी भरलेला भयावह चेहरा' ...अनिता दाते येतेय 'जारण'मधून

'सजना' ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित एक प्रेमकथा आहे. या चित्रपटाची निर्मिती सुप्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे यांनी केली आहे तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन सुद्धा शशिकांत धोत्रे यांनी केलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीत प्रेम, भावना आणि संगीत यांचं अनोखं मिश्रण घेऊन येणारा "सजना" हा नवा चित्रपट २३ मे २०२५ ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news