Sonu Nigam: सोनू निगम गंभीर आरोग्य समस्येशी झुंज देतोय; औषधांमुळे आवाजावरही परिणाम; व्हिडिओ पाहून डोळ्यात येईल पाणी

प्रसिद्ध गायक सोनू निगम गेल्या आठवड्यापासून मज्जातंतूशी संबंधित एका वेदनादायक समस्येशी झुंज देत आहे.
Sonu Nigam
Sonu Nigamfile photo
Published on
Updated on

Sonu Nigam

मुंबई: प्रसिद्ध गायक सोनू निगम गेल्या आठवड्यापासून मज्जातंतूशी संबंधित एका वेदनादायक समस्येशी झुंज देत आहे आणि त्यावर वैद्यकीय उपचार घेत आहे. अनेक वैद्यकीय तपासण्या, औषधोपचार आणि फिजिओथेरपी सुरू असतानाही त्यांनी मुंबईतील नियोजित कार्यक्रम रद्द न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये सोनू निगम यांनी सांगितले की, त्यांच्या काही नसांवर दाब आल्यामुळे त्यांना तीव्र वेदना होत आहेत. या समस्येचे नेमके स्वरूप समजून घेण्यासाठी त्यांनी गेल्या आठवडाभरात अनेक MRI आणि CT Scan तपासण्या केल्या आहेत. “माझ्या नसांवर दाब आला आहे. गेल्या आठवडाभरापासून MRI आणि CT Scan करत आहे. अनेक औषधेही घेत आहे,” असे त्यांनी सांगितले.

Sonu Nigam
IIT Bombay antibiotic research : जुनी प्रतिजैविके पुन्हा प्रभावी करण्याचा नवा मार्ग

फिजिओथेरपी ठरली सर्वाधिक वेदनादायक

उपचार प्रक्रियेविषयी माहिती देताना सोनू म्हणाले की, फिजिओथेरपीचा अनुभव अत्यंत वेदनादायक ठरला आहे. वेदना कमी करण्यासाठी त्यांना पेनकिलर्स घ्यावे लागत आहेत. “फिजिओथेरपी खूपच वेदनादायक होती. सध्या मी वेदनाशामक औषधे घेत आहे. त्यामुळे माझा घसाही थोडा जड झाला आहे,” असे त्यांनी सांगितले.

स्नायूंना आराम देण्यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांचा परिणाम त्यांच्या आवाजावरही होत असल्याचे त्यांनी नमूद केले. गायकासाठी ही बाब विशेषतः चिंतेची मानली जाते, कारण लवकरच त्यांना थेट प्रेक्षकांसमोर सादरीकरण करायचे आहे.

तब्येत बिघडली तरी कार्यक्रम रद्द नाही

आरोग्याच्या अडचणी मान्य करताना सोनू निगम यांनी स्पष्ट केले की, ते कोणत्याही परिस्थितीत आपला कार्यक्रम रद्द करणार नाहीत. बराच काळानंतर पुन्हा रंगमंचावर परफॉर्म करण्याची संधी मिळत असल्याने चाहत्यांशी केलेले वचन पूर्ण करण्याचा त्यांचा निर्धार आहे. वेदना आणि औषधांच्या परिणामामुळे आवाजावर परिणाम झाला असला तरी आपण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

सोनू निगम यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. अनेकांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर काहींनी कठीण परिस्थितीतही कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि जिद्द यांचे कौतुक केले.

Sonu Nigam
Brain Eating Amoeba | 'मेंदू खाणाऱ्या' अमिबा संसर्गावर होणार यशस्‍वी उपचार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news