

पुढारी ऑनलाईन डेस्क - लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये सोनू भिडे ही भूमिका साकारणारी झील मेहता आता विवाहबंधनात अडकणार आहे. ती लॉन्गटाईम बॉयफ्रेंड आदित्य दुबे सोबत लग्न करणार आहे.
आता तिने आपल्या वेडिंग डेट विषयी देखील खुलासा केला आहे. रिपोर्टनुसार, आपले वेडिंग प्लॅन्स विषयी झील म्हणाली, मी खूप दिवसांपासून या दिवशीची प्रतीक्षा करत होते. मला विश्वासच होत नाही की, हा दिवस इतका जवळ आला आहे. आमचे लग्न ट्रॅडिशन आणि मार्डन स्टाईल मिक्स असेल. दोघेजण २८ डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार आहेत.
झीलने आपल्या लग्नाबद्दल उत्सुकता जाहिर केली आहे. ती म्हणाली की, मी आता शांत आहे. मी विचार केला होता की, प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट मॅनेज करेन. आम्ही पती-पत्नी म्हणून नव्या वर्षात प्रवेश करत आहेह. ही एक इंटीमेट वेडिंग असेल. परिवारातील काही जवळचे लोक आणि मित्र उपस्थित असतील.' झील म्हणाली की, ती आपल्या सह-कलाकारांना रिसेप्शनमध्ये बोलावेल.