

Sonakshi Sinhavisit mosque:
बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं जहीर इकबाल सोबत लग्न केलं आहे. त्यानंतर ती सोशल मीडियावर आपल्या पतीसोबतच्या अनेक गोष्टी शेअर करत असते. हे सोशल मीडियावरील एक चर्चेत असलेलं बॉलीवड कपल ठरलं आहे. चाहते देखील या दोघांच्या या केमेस्ट्रीवर वेळोवेळी रिएक्शन देत असतात. सोनाक्षी सिन्हाने नुकतेच आपला नवा व्लॉग शेअर केला आहे. त्यात जहीर इकबाल सोनाक्षीच्या धर्म परिवर्तनाबाबत एक गंमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे.
सोनाक्षी सिन्हा हा आपल्या इन्स्टाग्रामवर डेली व्लॉग शेअर करते. या व्लॉगमध्ये सोनाली म्हणते. आज आम्ही अबू धाबीमध्ये आहोत. ही ट्रीप थोडी खास आणि उत्हावर्धक असणार आहे. अबू धाबी टुरिझमकडून आम्हाला इथली सुंदरता पाहण्यासाठी बोलवण्यात आलं आहे. आमच्यासाठी खूप चांगली सोय करण्यात आली आहे.
सोनाक्षी पुढे म्हणते की अबू धाबीत येऊन मी खूप एक्सायटेड झाली आहे. मी पहिल्यांदाच कोणत्यातरी मस्जिदीत जाणार आहे. मी मंदिरात आणि चर्चमध्ये गेले आहे. मात्र मस्जिदमध्ये कधी गेले नाही. सोनाक्षीच्या या वक्तव्यावर जहीरनं चेष्टा करत असं होऊ शकत नाही असं म्हटलं.
सोनाक्षीच्या मस्जिद वाल्या गोष्टीवर प्रतिक्रिया देताना जहीर म्हणाला मी इथंच स्पष्ट करू इच्छितो की मी तिला मस्जिदीत धर्म परिवर्तनासाठी घेऊन जात नाहीये. ती एक सुंदर जागा आहे आम्ही ती पाहण्यासाठी जात आहे. ज्या प्रकारे आम्ही मंदिरे आणि चर्च पाहतो त्याच प्रकारे आम्ही मस्जिद देखील पाहणार आहोत. त्यावर सोनाक्षी सिन्हानं स्पेशल मॅरेज अॅक्ट जिंदाबाद असं म्हणत प्रतिक्रिया दिली.
दरम्यन सोनाक्षीच्या व्लॉगवर लोकांनी जहीरची रिअॅक्शन ऐकल्यावर त्यांनी जहीरवर स्तुतीसुमने उधळण्यास सुरूवात केली. चाहत्यांनी जहीरला ग्रीन फ्लॅग देत एक उत्तम पती असा टॅग देखील दिला.
जहीर आणि सोनाक्षी यांनी २३ जून २०२४ ला लग्न केलं होतं. दोघांनी स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार ही लग्नगाठ बांधली होती. पूर्वीश्रमीचे भाजप नेते असलेल्या क्षत्रुघ्न सिन्हांच्या मुलीनं दुसऱ्या धर्मात लग्न केल्यानं ती ट्रोल देखील झाली होती. मात्र याचा या दोघांच्या नात्यावर काही फरक पडला नाही. मध्यंतरी सोनाक्षी गरोदर असल्याची देखील चर्चा होती. मात्र सोनाक्षीनं ही अफवा असल्याचं स्पष्ट केलं.