'सितारे जमीन पर' : आमीर खान दिसणार 'या' भूमिकेत

Sitare Zameen Par : स्वतः अभिनेत्यानेच केला खुलासा
Sitare Zameen Par Movie
'सितारे जमीन पर' file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :आमिर खानचा आगामी चित्रपट 'सितारे जमीन पर' लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे. या आधी तारे जमीन पर हा सुपर डुपर हिट चित्रपट दर्शील सफारीला घेऊन आमीर खानने केला होता. आता या नवीन चित्रपटाद्वारे तो प्रेक्षकांसोर येत आहे. आमीर खान त्याचे मोजकेच पण उत्कृष्ट प्रोजेक्ट्स करण्यासाठी ओळखला जातो.

आता आमीर खान त्याच्या या आगामी 'सितारे जमीन पर' चित्रपटाबद्दल मोकळेपणाने बोलला आहे. त्याने चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दलही सांगितले आहे. तारे जमीन पर चित्रपटापेक्षा सितारे जमीन पर चित्रपटातील त्याचे पात्र कसे वेगळे असेल याचा खुलासा स्वतः आमिर खानने केला आहे. आमिर खानचे चीनमध्ये अनेक फॉलोअर्स आहेत. त्यांनी अलिकडेच चीनला भेट दिली आणि मकाऊ कॉमेडी फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला. येथे तो या त्याच्या नव्या चित्रपटाबद्दल बोलला.

चित्रपटाबद्दल काय म्हणाला आमीर ?

आमिर खान लवकरच त्याच्या 'सितार जमीन पर' या नव्या चित्रपटात दिसणार आहे. त्याने या चित्रपटातील पात्रांबद्दल दिलखुलासपणे सांगितले आहे. त्याने सांगितले आहे की या चित्रपटात त्याने एका 'चिडखोर' बास्केटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे.

चीनमधील एका फॅन क्लबशी बोलताना आमिर खानने 'सितारा जमीन पर' बद्दल अनेक खुलासे केले. आमिर खान म्हणाला, 'सितार जमीन पर' जवळपास तयार आहे. हा चित्रपट 'तारे जमीन पर'चा सिक्वेल आहे. हे त्याच्या १० पावले पुढे आहे. हा चित्रपट अपंग लोकांचे प्रतिनिधित्व करतो. 'तारे जमीन पर' चित्रपटाने तुम्हाला रडवले पण हा चित्रपट तुम्हाला नक्कीच हसवेल. हा विनोदी चित्रपट आहे पण विषय तोच आहे.

चित्रपटातील भूमिकेविषयी काय म्हणाला आमीर ?

चित्रपटातील भूमिकेविषयी बोलताना आमीर म्हणाला की, 'तारे जमीन पर' मधील माझे पात्र खूप संवेदनशील होते. या चित्रपटातील माझे पात्र याच्या अगदी उलट आहे. मी खूप कडक आहे. यामध्ये मी माझ्या पत्नी आणि आईशी भांडतो. यातील माझी भूमिका एका बास्केटबॉल प्रशिक्षकाची आहे जो त्याच्या वरिष्ठांना हरवतो.

आरएस प्रसन्ना यांनी केले आहे दिग्दर्शन

'सितारे जमीन पर' या चित्रपटाचे दिग्दर्शन आरएस प्रसन्ना यांनी केले आहे. सर्व अपंग लोक मिळून चित्रपटात कडक प्रशिक्षकाच्या भूमिकेत असणा-या आमिरला एक चांगला माणूस होण्याचा अर्थ कसा शिकवतात अशा आशयाभोवती हा चित्रपट साकारला गेला आहे. हा मुळातच एक स्पॅनिश चित्रपट आहे. या चित्रपटात जेनेलिया देशमुख मुख्य भूमिका साकारत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news