

पुढारी ऑनलाईन डेस्क - मागील अनेक दिवसांपासून रोहित शेट्टी आणि अजय देवगनचा चित्रपट Singham Again ची चर्चा होत आहे. कधी डिजिटल राईट्स तर कधी चित्रपटाच्या प्रोडक्शनशी संबंधित वृत्त समोर येते. रिपोर्ट्सनुसार, 'सिंघम अगेन'चा ट्रेलर भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वात मोठा ट्रेलर असेल. हा ट्रेलर जवळपास ५ मिनिटांचा असेल. (Rohit Shetty-Ajay Devgn)
'सिंघम अगेन' २०२४ च्या काही सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे. रिपॉर्टनुसार, ट्रेलर ४ मिनिटे ४५ सेकंदाचा आहे. ''रोहित शेट्टी 'सिंघम अगेन'चा मसालेदार ट्रेलर घेऊन आला आहे. त्यामध्ये ॲक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये अजय, अर्जुन कपूर, अक्षय कुमार, करीना कपूर, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ यांच्या भूमिका आहेत. रोहितने हा ट्रेलर 'एवेंजर्स' सारखा बनवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे.''
‘सिंघम अगेन’ मध्ये अर्जुन कपूर - जॅकी श्रॉफ खलनायकाच्या भूमिकेत असतील. चित्रपटाचे बजेट जवळपास २५० कोटी रुपये सांगितले जात आहे. रिपोर्ट्सनुसार 'सिंघम अगेन'चा ट्रेलर ७ ऑक्टोबरला रिलीज केला जाईल. हा चित्रपट १ नोव्हेंबरला रिलीज होईल. पण, आतापर्यंत चित्रपटाची कन्फर्म रिलीज डेट सांगितलेली नाही. पण, असे म्हटले जात आहे की, दिवाळीला हा चित्रपट रिलीज केला जाईल. 'सिंघम अगेन'चे क्लॅश कार्तिक आर्यनचा चित्रपट 'भूलभुलैया ३' शी होणार आहे.