

गायिका सुनंदा शर्मा हिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात तिने आपल्या ‘जबरा फॅन’ला स्टेजवर बोलावून आलिंगन दिलं. या कृतीमुळे चाहत्यांमध्ये भावनिक लहर निर्माण झाली असून सुनंदाचं कौतुक होत आहे.
who is Sunanda Sharma video viral with crazy fan
मुंबई - पंजाबी गायिका आणि अभिनेत्री सुनंदा शर्मा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. तिचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून त्यात ती तिच्या एका चाहत्याला स्टेजवर बोलावून त्याला प्रेमानं आलिंगन देते. या क्षणाने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. कोण आहे सुनंदा शर्मा?
हा व्हिडिओ सुनंदाच्या अलीकडच्या लाइव्ह कॉन्सर्टदरम्यानचा आहे. गाणं सुरू असतानाच प्रेक्षकांमध्ये एक युवक तिच्या गाण्यावर वेड्यासारखा नाचताना दिसतो. सुनंदा त्याच्याकडे पाहते आणि हसत त्याला स्टेजवर बोलावते. क्षणातच संपूर्ण सभागृहात जल्लोष होतो. तो फॅन स्टेजवर आल्यानंतर सुनंदा त्याला आलिंगन देते.”
हा क्षण तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी कॅमेऱ्यात टिपला आणि काही सेकंदांतच तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. इन्स्टाग्राम आणि एक्स अकाऊंटवर #SunandaSharma हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे. चाहते म्हणत आहेत, “आजच्या काळात एवढी नम्र कलाकार कमीच मिळतात.”
सुनंदा शर्मा ‘पत्ते दे’ आणि ‘जाणी’सारख्या हिट गाण्यांसाठी ओळखली जाते. तिच्या दमदार आवाजामुळे आणि साध्या स्वभावामुळे ती प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करू शकली आहे. अलीकडेच तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, “फॅन्समुळेच मी इथपर्यंत पोहोचले आहे, त्यांचं प्रेमच माझी ओळख आहे.”
सध्या या व्हिडिओला काही तासांतच लाखो व्ह्यूज आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत. इंटरनेटवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेक फॅन्सनी "वर्षातील सर्वात प्रेमळ क्षण" म्हटलं आहे आणि गायिकेचे कौतुक केले आहे. ती इतकी लोकप्रिय असून देखील डाऊन टू अर्थ असल्याचे म्हटले जात आहे.
सुनंदा आणखी एका वृत्तामुळे चर्चेत आहे. मम्मी नू पसंद आणि पोस्टर लगवा दो सारखी हिट गाणी तिने दिली आहेत. तिने इंडिपेंडेट लेबल, सुनंदा शर्मा म्युझिक लॉन्च केलं आहे. आता "दिलबर"चे टीजर ती जारी केलं आहे.
कोण आहे सुनंदा शर्मा?
सुनंदाचा जन्म ३० जानेवारी, १९९२ रोजी झाला असून तिने आपल्या करिअरची सुरुवात युट्यूबवर कव्हर गाणी अपलोड करून केली होती. तिला लोकप्रियता मिळाली ती सिंगल "बिल्ली अख"मधून. २०१७ मध्ये "जानी तेरा ना" हिट गाणं दिलं. युट्यूबवर ३३४ मिलियनहून अधिकवेळा पाहण्यात आलं आहे. संगीत शिवाय तिने सज्जन सिंह रंगरूटमध्ये दिलजीत दोसांझ सोबत अभिनय रेला होता. कान फिल्म फेस्टिव्हल २०२४ मध्ये भारताचे रिप्रेजेंट केल होतं.