

पुढारी ऑनलाईन डेस्क : गायिका शारदा सिन्हा यांची प्रकृती गंभीर असून त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. (Sharda Sinha Health Update) दरम्यान, उपचारासाठी पूर्ण मदतीचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले आहे. (Sharda Sinha Health Update)
'पद्मश्री' आणि 'पद्मभूषण' सन्मानित प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांची प्रकृती गंभीर आहे. मागील काही दिवसांपासून शारदा सिन्हा यांना दिल्ली येथील एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. चाहते त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शारदा सिन्हा यांच्या आरोग्याची माहिती त्यांचा मुलगा अंशुमान यांच्याकडून फोनवरून घेतली.
शारदा सिन्हा यांच्या प्रकृतीबाबतची अपडेट नरेंद्र मोदी यांनी अंशुमन यांना फोन करून घेतली. पीएम मोदी यांनी अंशुमन यांना आपल्या आईवर पूर्ण उपचार करण्यासाठी सल्ला दिला. भाजपच माजी मंत्री अश्विनी चौबे यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिलीय की, शारदा सिन्हा बिकट परिस्थितीशी लढत आहेत. इन्फेक्शन वाढल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.