“घर घर महावीर” गीतातून भगवान महावीरांच्या शिकवणुकीचा संदेश

घर घर महावीर गीत
घर घर महावीर गीत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : संपूर्ण जगाला अहिंसेच्या परममंत्राचा उपदेश देणारे भगवान महावीर यांचे कार्य अलौकिक आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन तयार केलेल्या "जिसने जीता सब कर्मों को, जग को ऐसा अतिवीर चाहिए, त्रिशला के सुत जैसा हमें वीर चाहिए, घर घर में ऐसा महावीर चाहिए" या हिंदी गीताचे प्रकाशन मुनीश्री प्रणामसागर महाराज यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या गीताची प्रस्तुती आणि संकल्पना उदय गाडगीळ यांची आहे. सध्याचा आघडीचा प्रसिद्ध संगीतकार आणि पार्श्वगायक हर्षित अभिराज यांनी हे गीत संगीतबद्ध केले आहे. या गीताचे गायन आणि लेखन हर्षित भिराज यांनी केले आहे.

मुनीश्री प्रणामसागरजी महाराज म्हणाले, "आताच्या काळात प्रत्येक घरात भगवान महावीर यांच्या जगा व जगू द्या, उत्तम क्षमा, अपरिग्रह, हे संदेश उराशी बाळगून समाजाच्या कल्याणासाठी झटणार्‍या पिढीची गरज आहे. हीच भावना मनात ठेऊन हे गीत हर्षित यांनी भगवान महावीर यांना आणि रसिकांना समर्पित केले आहे.

यावेळी भगवान महावीर ट्रस्टचे अध्यक्ष अजित पाटील, प्रकाश शेडबाळे, विरेंद्र जैन, सुरगोंडा पाटील आणि इतर मान्यवर तसेच संगीत रसिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. या गीताचं संगीत संयोजन हर्षित यांच्या बरोबर शैलेश येवले आणि सचिन अवघडे यांनी केले आहे. उदय गाडगीळ, शैलेश भावसार, अवंतिका मंडलिक, सुवर्णा कोळी, जया पवार, प्रशांत पवार यांनी वृंदगान केले आहे.

video – Shrinivas G. Kulkarni you tube वरून साभार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news