'टिप टिप बरसा पानी'चं असं व्हर्जन; श्वेताचे ठूमके रवीना पाहतच राहिली!

'टिप टिप बरसा पानी'चं व्हर्जन आयुष्यात पाहिले नाही; श्वेताचे ठूमके रवीना पाहतच राहिली!
Raveena Tandon Shweta Tiwari
'टिप टिप बरसा पानी'चं असं व्हर्जन; श्वेताचे ठूमके रवीना पाहतच राहिली! Raveena Tandon Shweta Tiwari
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'आपका अपना झाकीर' या शोची सध्या खुपच चर्चा होत आहे. नुकतेच धमाकेदार 'स्त्री २'चित्रपटातील बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी या शोत हजेरी लावत अनेक रंजक गोष्टींची चर्चा केली. दरम्यान या शोत बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन पाहुणी कलाकार म्हणून येणार आहे. या शोचा एक नवीन प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात अभिनेता ऋत्विक धनजानी आणि बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारीही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करताना दिसत आहेत. दरम्यान, रवीनाच्या 'टिप टिप बरसा पानी' या लोकप्रिय गाण्याबद्दल चर्चा झाली. आणि श्वेताने या गाण्यावर धमाकेदार परफार्मन्स केला. मात्र, हा परफार्मन्स पाहून रवीना आश्चर्यचकित झाली.

वास्तविक, 'आपका अपना झाकीर' या शोच्या लेटेस्ट एपिसोडचा एक प्रोमो टीव्हीच्या इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यात ऋत्विक रवीनाशी मनमुराद गप्पागोष्टी करताना दिसतोय. याच दरम्यान तो ' पावसात रवीना तिच्या घरी गॅस न लावताच पकोडे तळते.' असे म्हणतो. यानंतर रविना त्याला कसे? असा प्रश्न विचारते. यावर तो 'टिप टिप बरसा पानी, पानी ने आग लगाई।'. या गाण्याचे बोल बोलतो. यानंतर मात्र, रविनासह सगळेजण पोट भरून हसायला लागलेय.

दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारी या गाण्यावर पिवळ्या साडीत धमाकेदार डान्स करताना दिसली. श्वेताने रवीनाच्या डान्सची कॉपी केली होती. मात्र तिच्या डान्स स्टेप भारदस्त होत्या. सगळ्यांना तिचा डान्स खूपच आवडला. रवीनानेही श्वेताच्या डान्सचे कौतुकही केलं.

या व्हिडिओमध्ये श्वेता तिवारीवर पाण्याचा वर्षाव होत असून ती पूर्णपणे भिजलेली दिसत आहे. गाण्यात ऋत्विक अक्षय कुमारच्या भूमिकेत होता. पण, सगळ्यांच्या नजरा या श्वेताच्या स्टाईलवर खिळल्या. एकिकडे श्वेताच्या डान्सचे भरभरून कौतुक झाले. मात्र, दुसरीकडे हा डान्स पाहिल्यानंतर रवीनाने तिची पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. यात ती म्हणाली की, 'टिप टिप बरसा पानी'चे असे व्हर्जन मी माझ्या आयुष्यात पाहिले नाही. मला आयुष्यभर आठवणीत राहिल.' तिचे बोलणे ऐकून सगळे जोरजोरात हसायला लागले.

Raveena Tandon Shweta Tiwari
टिप-टिप बरसा पानी..चिंब पावसात पूजा सावंतच्या मोहक अदा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news